Download App

‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! ‘या’ तारखेला मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित

Karmayogi Abasaheb trailer launch : राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” (Karmayogi Abasaheb) या चित्रपटातून घेतला जाणार (Karmayogi Abasaheb trailer) आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आलाय. २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं (Karmayogi Abasaheb Film Date) आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत.

कोणत्या कलाकारांनी साकारल्या भूमिका ?

Film Awards: हाताला प्लास्टर बांधून दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले मिथुन चक्रवर्ती

चित्रपटात अनिकेत विश्वासराव, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिलंय. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वातावरण आता चांगलंच तापू लागलंय.

Berlin Film Premiere: अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ची जोरदार चर्चा, IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

चित्रपटात नेमकं काय?

निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू झालीय. त्यामुळे आता प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी मा. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच आहेत. त्यामुळेच “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटामधून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील आणि विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आलाय. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम देखील दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलंय. या सर्वांचं दर्शन आपल्याला “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटाच्या माध्यमातून घडणार आहे.

 

follow us