Film Awards: हाताला प्लास्टर बांधून दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले मिथुन चक्रवर्ती

Film Awards: हाताला प्लास्टर बांधून दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले मिथुन चक्रवर्ती

70th National Film Awards Updates: आज दिल्ली येथे 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (70th National Film Award) 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. (National Film Award) तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना बॉलीवूडमधील (Bollywood) महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्व विजेत्यांना हा सन्मान स्वतःच्या हाताने देणार आहेत.


यासोबतच यावर्षी कन्नड सुपरस्टार आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘आत्तम’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर नीना गुप्ताला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. पवन मल्होत्राला ‘फौजा’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

या चित्रपटांना पुरस्कारही मिळाले

याशिवाय ‘कंतारा’ला सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक फीचर फिल्म आणि ‘केजीएफ: चॅप्टर 2’ला सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. या वर्षी, 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना पुरस्कार मिळत आहेत, ज्यांना कोविडमुळे एक वर्ष उशीर झाला होता. तसेच, यावर्षी नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. नित्याला हा पुरस्कार तिच्या ‘तिरुचित्रबलम’ चित्रपटासाठी मिळाला आहे, तर मानसीला ‘कच्छ एक्सप्रेस’साठी हा पुरस्कार मिळाला आहे.

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

या यादीत विशाल भारद्वाजच्या नावाचाही समावेश आहे, ज्यांना त्यांच्या ‘फुरसात’ चित्रपटासाठी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळणार आहे. तसेच मल्याळम चित्रपट ‘अट्टम’ ने यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब पटकावला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एकरशी आहेत. ज्यात झरीन शिहाब, विनय फोर्ट आणि कलाभवन शाजोहान सारखे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube