Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award 2024: बॉलिवूड (Bollywood) स्टार मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (Dadasaheb Phalke Award 2024) भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 8 ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मिथुन दा यांचा उल्लेखनीय चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो!”


अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnav) पुढे लिहिले, “मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल महान अभिनेते मिथुन चक्रवर्ती जी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. “हा पुरस्कार 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाईल.”

मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप यांना पद्मभूषण, राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कारांनी केले सन्मानित

मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदी, तमिळ आणि बंगालीसह 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1976 मध्ये आलेल्या ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 1982 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. 100 कोटींचा व्यवसाय करणारा हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने मिथुन सुपरस्टार झाला.

350 हून अधिक चित्रपट केले, 3 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले

16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथुनदा यांनी बंगाली, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये 350 हून अधिक चित्रपट केले आहेत. तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube