PM Modi : ‘रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच PM मोदींनी मिथुन चक्रवर्तीला फटकारले, म्हणाले…

PM Modi : ‘रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच PM मोदींनी मिथुन चक्रवर्तीला फटकारले, म्हणाले…

PM Modi slams Mithun Chakraborty: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती अलीकडेच अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पीएम मोदींनी (PM Modi ) अभिनेत्याची प्रकृती विचारण्यासाठी फोन केला आणि अभिनेत्याला चांगलेच फटकारले आहे. शिवाय, त्याला हॉस्पिटलमध्ये का जावे लागले हे देखील अभिनेत्याने सांगितले. त्याच्या चुकीची शिक्षा मला मिळाली आहे, असे अभिनेत्याने सांगितले.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मिथुनला सोमवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर स्वत: अभिनेत्याने त्याच्या तब्येतीचे अपडेट्स दिली आहे. मी आता ठीक असून लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मी लवकरच काम सुरू करू शकतो, कदाचित उद्यापासून देखील मी काम करू शकतो. मी राक्षसासारखा खातो म्हणून मला शिक्षा झाली. प्रत्येकाला माझा सल्ला आहे की तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवा. मिठाई खाल्ल्याने काही फरक पडणार नाही, असा गैरसमज मनाशी बाळगू नये. आहारावर नियंत्रण ठेवा.

Mithun Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना केलं अचानक रुग्णालयात दाखल

पंतप्रधानांनी फटकारले: मिथुनने असेही सांगितले की, 11 फेब्रुवारी रोजी त्यांना पीएम मोदींचा फोन आला होता आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी न घेतल्याबद्दल अभिनेत्याला चांगलंच सुनावले आहे. मिथुन दा यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी हॉस्पिटलने अधिकृत निवेदनात सांगितले होते की मिथुनला मेंदूचा इस्केमिक सेरेब्रोव्हस्क्युलर अपघाती स्ट्रोक झाल्याचे निदान झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचाराबाबत बोलताना अभिनेता म्हणाला, ‘पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा मतदारसंघांची काळजी कोण घेणार? मी करीन. मी भाजपशी सक्रियपणे संलग्न राहणार आहे. असे विचारले तर मी इतर राज्यांतही निवडणूक प्रचारासाठी जाणार आज. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप आदर करतो.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज