Download App

Kartik Aryan : कार्तिकच्या ‘शहजादा’ला पठान आणि अ‍ॅन्ट मॅनचा फटका

  • Written By: Last Updated:

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा भूलभुलैया 2 हा चित्रपट गेल्याकाही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आलेला चित्रपट आहे. त्यानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्री बुकिंग सुरू झाली आहे आणि हा चित्रपट विकल्या गेलेल्या शोमध्ये ओपनसाठी सज्ज आहे.

Maharashtrachi Hasyajatra : कमाल गायलंस मित्रा, सत्यजित तांबेंकडून ओंकार भोजनेचं कौतुक !

मात्र आता या चित्रपटाला शाहरूख खानचा पठान आणि अ‍ॅन्ट मॅन या चित्रपटांमुळे कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाला फटका बसत आहे. चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. हा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ला मागे टाकेल असा दावाही त्यांनी केला. मात्र तसे होताना दिसत नाही. या चित्रपटाचे वीकेंडला किमान 50 कोटींचे कलेक्शन अपेक्षित होते. तो 20 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही. ‘शहजादा’चे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन 19.95 कोटी रुपये होते.

या बुकिंग गुणोत्तर पाहता वरुण धवनच्या भेडियाच्या तुलनेत या चित्रपटाची प्री-बुकिंग 15% अधिक आहे आणि संजय दत्तच्या शमशेरापेक्षा 25% कमी आहे. ओपनिंग वीकेंड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, शेहजादाला रु. 8 पेक्षा जास्त ओपनिंग अपेक्षित होते. सर्वांच्या नजरा आता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित शेहजादाकडे लागल्या होत्या.

शहजादा या सालची सर्वात मोठी फॅमिली इंटरटेनर आहे. चित्रपट रोहित धवन दिग्दर्शित असुन कार्तिक आर्यन कृति सेन, मनीषा कोइराला, परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर अभिनित आहे तर प्रीतम चे संगीत आहे. भूषण कुमार, अल्लू अरविंद, अमन गिल आणि कार्तिक आर्यन निर्मित. हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 ला रिलीज झाला आहे.

Tags

follow us