Download App

Katrina Kaif Deepfake Photo: रश्मिकानंतर आता कतरिना कैफ डीप फेकच्या जाळ्यात!

  • Written By: Last Updated:

Katrina Kaif Deepfake Photo: साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर (Rashmika Mandanna) आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) डीपफेकच्या जाळ्यात अडकली आहे. तिच्या आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) चित्रपटाच्या ‘टॉवेल सीन’मध्ये डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणीतरी त्याला टॉवेलऐवजी लाजिरवाणे कपडे घातल्याचे बघायला मिळत आहे. सध्या या कतरिना कैफचा हा फोटो सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे.


‘टायगर 3’ च्या ट्रेलरमध्ये कतरिना कैफची टॉवेलमधील फाईट प्रेक्षकांना आवडली. या सीनमध्ये कतरिना अतिशय शानदार अॅक्शन मोडमध्ये दिसली होती. ती टॉवेल घालून अगदी आरामात डान्स करताना दिसली आहे. अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर टॉवेल फाईट सीनच्या शूटच्या मागे एक फोटो पोस्ट केला होता, जो आता मॉर्फ केला गेला आहे.

Ratnagiri Rangoli | गणपती पावला! सर्वात लहान थ्रीडी रांगोळी... | LetsUpp Marathi

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘टायगर 3’ च्या ‘टॉवेल सीन’मधील कतरिना कैफच्या डीपफेक फोटोमध्ये, कतरिनाने पांढरा डीप प्लंगिंग नेकलाइन टॉप घातलेला दिसत आहे. यात तिची क्लीवेज खोलवर दिसते. तर कतरिनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने एक टॉवेल घातला होता. यामध्ये तिचा नेकलाइन पूर्णपणे झाकलेला होता आणि तो अजिबात अश्लील दिसत नव्हता.

Songya Movie: सोंग्या सिनेमात अजिंक्य अन् ऋतुजाची जोडी पुन्हा जमली!

कतरिनाच्या अगोदर रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये अभिनेत्री एक्स्ट्रा रिव्हीलिंग ड्रेस घालून लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसली होती. हा व्हिडिओ ब्रिटीश सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झारा पटेलचा होता. यामध्ये रश्मिकाचा चेहरा मॉर्फ करण्यात आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर झाराने तिची प्रतिक्रिया दिली होती आणि या प्रकरणात तिचा कोणताही सहभाग नसल्याचा दावाही केला होता.

काय आहे डीपफेक?
डीप फेक हा एक सिंथेटीक मीडियाचा प्रकार आहे. याच्या माध्यमातून एखादा फोटो किंवा व्हिडीओमधील व्यक्तीचा चेहरा बदलण्यात येतो. डीप फेकमध्ये खास करुन आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेक असल्याचे कधीही कळत नाही. अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्याच समन्वय नसणे यातून डीप फेक व्हिडीओ ओळखता येतात.

Tags

follow us