Rashmika Deep Fake Video: ‘माझं शरीर अन् तिचा चेहरा’, फेक व्हिडीओवर झाराची पहिली प्रतिक्रिया

Rashmika Deep Fake Video: ‘माझं शरीर अन् तिचा चेहरा’, फेक व्हिडीओवर झाराची पहिली प्रतिक्रिया

Zara Patel Reaction on Deep Fake Video: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. (Rashmika Deep Fake Video) या चर्चा रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. रश्मिकाच्या या खऱ्या व्हिडीओत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झारा पटेल आहे. आता झाराने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. झाराने (Zara Patel) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)


झाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने, “सर्वांना नमस्कार, माझ्या लक्षात आले आहे की कोणीतरी माझ्या शरीराचा आणि एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचा चेहरा वापरून एक डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. डीपफेक व्हिडीओत माझा कोणताही सहभाग नव्हता आणि जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आहे. मला स्त्रिया आणि मुलींच्या भवितव्याची काळजी वाटत आहे. ज्यांना आता सोशल मीडियावर स्वतःला ठेवण्याची भीती वाटत आहे. कृपया एक पाऊल मागे टाका आणि तुम्हाला इंटरनेटवर काय दिसते ते एकदा तपासत चला. इंटरनेटवरील सर्व काही खरे असते असं नाही. जे घडत आहे यामुळे मी खूप अस्वस्थ आहे” असे तिने यावेळी सांगितले आहे.

रश्मिकाच्या एका चाहत्याने एक्स अकाऊंटवर खरा आणि फेक असे दोन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पहिल्या व्हिडीओत झारा पटेल नावाची महिला डिप नेक काळ्या रंगाचा आऊटफिट घालून लिफ्टमध्ये एण्ट्री करत असताना बघायला मिळाली आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करुन झाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आल्याचे दिसत आहे. पत्रकार अभिषेक कुमार यांनी हा प्रकार उघकीस आणल्याचे समोर आले आहे.

Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढककली!

डीप फेक हा एक सिंथेटीक मीडियाचा एक अनोखा प्रकार आहे. याच्या माध्यमातून एखादा फोटो किंवा व्हिडीओमधील व्यक्तीचा चेहरा बदलण्यात येत असतो. डीप फेकमध्ये खास करुन आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेक असल्याचे नेमकं समजणार नाही. अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्याच समन्वय नसणे यातून डीप फेक व्हिडीओ ओळखता येत असतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube