Download App

Katrina बनली जागतिक उद्योजिका, दुबईतही लाँच झाला ब्युटी ब्रँड!

Katrina Kaif अभिनय आणि नृत्यासाठी तर ओळखली जातेच मात्र आता तिने तिची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे.

Katrina Kaif Launch her Beauty Brand in UAE : अभिनेत्री कतरिना कैफ ( Katrina Kaif ) अभिनय आणि नृत्यासाठी तर ओळखली जातेच मात्र आता तिने तिची आणखी एक नवी ओळख निर्माण केली आहे. कारण कतरिना आता एक उद्योजिका म्हणून जागतिक आयकॉन बनली आहे. नुकताच कतरिनाचा Kay Beauty हा ब्युटी ब्रँड संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये लॉंच करण्यात आला आहे.

…त्यानंतर फडणवीसांना नमस्कार घालायलाही माणूस राहणार नाही; धंगेकरांचा घणाघात

भारतातील हा पहिला सेलिब्रिटी मेकअप ब्रँड त्याचा नावीन्यपूर्ण प्रॉडक्ट्ससाठी ओळखला जातो. Nykaa भारतातील आघाडीचे सौंदर्य आणि फॅशन डेस्टिनेशन आणि कतरिना कैफ यांनी सह-निर्मित के ब्युटी झपाट्याने देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सेलिब्रिटी ब्युटी ब्रँडपैकी एक बनली आहे.#ItsKayToBeYou या ब्रँडच्या मूळ टॅगलाईन सोबत कतरिना हा ब्रँड दुबईत लाँच करत असताना तिला खूप आनंद होतोय.

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल स्वप्नीलने मानले प्रेक्षकांचे आभार; म्हणाला…

अवघ्या चार वर्षांत के ब्युटीने INR 1.5 अब्जच्या एकूण मार्जिन मूल्याची बढाई केली आहे. लॉन्च बद्दल बोलताना के ब्युटीच्या सह-संस्थापक कतरिना कैफ म्हणते ” शेवटी के ब्युटी ला UAE ला आणून मला खूप आनंद होतो. के ब्युटीला जागतिक स्तरावर नेणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

follow us