Katrina Kaif Deepfake Video: रश्मिकानंतर आता कतरिना कैफ पुन्हा डीप फेकच्या जाळ्यात!

Katrina Kaif Deepfake Video: रश्मिकानंतर आता कतरिना कैफ पुन्हा डीप फेकच्या जाळ्यात!

Katrina Kaif Deepfake Video: आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अलीकडच्या काळात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) समोर आले होते. या प्रकरणात, साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ खूपच चर्चेत होता. ते व्हायरल झाल्यानंतर ते थांबण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif Türkiye (@katrinakaifturkey)


अलीकडेच पोलिसांनी (police) याप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती, ज्यावर अभिनेत्रीनेही तिची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्यानंतर नोरा फतेही आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओही समोर आला होता.आता कतरिना कैफ दुसऱ्यांदा या प्रकरणाची शिकार झाली आहे. या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती ‘फायटर’ अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे.

कतरिनाचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल: कतरिना कैफचा (Katrina Kaif) डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती तुर्की भाषा अगदी सहजतेने बोलताना दिसत आहे. खरंतर हा व्हिडिओ 2014 सालचा आहे. जेव्हा कतरिना आणि हृतिक रोशनचा ‘बँग बँग’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा व्हिडिओ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. हा 10 वर्षे जुना व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याच्या चाहत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही तुर्की बोलता, तर हे घडले असते… टीप: हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार करण्यात आला आहे.’ यामुळे सेलिब्रिटींना त्रास झाला आहे.

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘अरे देवा, हा अगदी त्याच्या खऱ्या आवाजासारखा वाटतो.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे सर्व खूप धोकादायक आहे. हे त्वरित कोठेतरी थांबवलं पाहिजे.

Sholay चित्रपटाला सलाम करण्यासाठी येतोय ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’

कतरिना कैफ वर्कफ्रंट: कतरिना कैफ सध्या तिच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हृतिक रोशन त्याच्या ‘फायटर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज