Download App

क्राईम, आणि मर्डर मिस्ट्री…. ओटीटीवर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘मेरी ख्रिसमस’

Merry Christmas OTT Release: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) या वर्षी 12 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांनी केले आहे, त्यामुळे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला थोडासा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर फार काही कामगिरी करू शकला नाही. बॉक्स ऑफिसनंतर आता हा चित्रपट ओटीटी (OTT ) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

‘मेरी ख्रिसमसमध्ये कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चाहत्यांना ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली आहे. विजय आणि कतरिनाची जोडी खूप आवडली.

या दिवशी मेरी ख्रिसमस रिलीज होणार: कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस 8 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्यासाठी कतरिनाचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता प्रतीक्षा संपली आहे.

बॉक्स ऑफिसवर अशी कामगिरी: मेरी ख्रिसमसच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 2.55 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटासाठी 10 कोटींची कमाई करणेही कठीण होत आहे. चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन 26.25 कोटी होते.

Kanni Song: मैत्रीचा अर्थ `यारा रे’ सांगणार, ‘कन्नी` चित्रपटाचे दुसरे साँग रिलीज

मेरी ख्रिसमसच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ही हत्या नाताळच्या रात्री घडली. त्या दिवशी मारिया आणि अल्बर्ट भेटतात आणि दोघे प्रेमात पडतात. कतरिना आणि विजयशिवाय या चित्रपटात संजय कपूर, राधिका आपटे, टिनू आनंद आणि विनय पाठक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

follow us