Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तो चांगलंच वादाच्या भवऱ्यात सापडला आहे, व्हिएफएक्स व संवादासाठी वापरण्यात आलेल्या भाषेवर मोठा आक्षेप घेण्यात येत आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर सोशल मीडियातून (Social media) या सिनेमावर प्रचंड मोठ्या प्रमाणांत टीका केली जात आहे. अनेक चाहत्यांनी सुद्धा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) सुद्धा आदिपुरुष या सिनेमाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण, केतकी चितळेने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असते. मात्र तिने आता आदिपुरुष या सिनेमाबद्दल अशी काही पोस्ट लिहिली आहे की, यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने आदिपुरुष सिनेमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पोस्टमध्ये तिने रावणाचा उल्लेख ‘श्रीरावण’ असा केला आहे.
नेमकी काय आहे पोस्ट?
बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष सिनेमाबद्दल काय मत आहे? मी सिनेमा पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. मात्र ज्या सिनेमाच्या टीचरमध्ये शिवभक्त दशानंद रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर तो सिनेमा मी बघणार नाही, असं केतकीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल
तसेच केतकी पुढे म्हणते की, रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते, ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर बांधले होते. सोमनाथ मंदिर हे अनेक वेळा पाडले आहे आणि बऱ्याच राज्यांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले. ‘त्यांच्यापैकी एक श्री रावणही आहेत. “रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल. एकंदरीत केतकीची ही पोस्ट पाहता आता एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.