‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल

‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल

Adipurush :  प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. मात्र, या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगमध्ये शाहरुख खान आणि गायत्री जोशी यांचा ‘स्वदेश’ चित्रपटातील रामायण सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक म्हणतात की, आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेश’ चित्रपटातील रामायण सीन ही क्लिप ओम राऊतच्या संपूर्ण ‘आदिपुरुष’ सिनेमापेक्षा चांगली आहे. ‘

काही लोकांना प्रभास आणि क्रितीचा आदिपुरुष आवडतो तर काही लोकांना तो नापसंत आहे. काहीजण चित्रपटाच्या बॅकग्राउंड स्कोअर, थ्रीडी शॉट्सचे कौतुक करत आहेत, तर काहींना त्याचे व्हीएफएक्स, संवाद आणि पात्रांचे पोशाख आवडले नाहीत. दरम्यान, 2004 मध्ये आलेल्या स्वदेश चित्रपटाची एक क्लिप व्हायरल होत आहे. या सीनमध्ये शाहरुख राम लीलादरम्यान उपस्थित लोकांना रामायणाचे महत्त्व समजावून सांगत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

ही 50 सेकंदाची क्लिप 500 कोटींच्या सिनेमाच्या बजेटपेक्षा आनंददायी असल्याचे एका यूजरने म्हटले आहे. तर आणखी एका यूजरने म्हटले आहे की, 2004 मध्ये, स्वदेसने ओम राऊतच्या गाण्यापेक्षा रामायणाचे अधिक चांगले, अधिक प्रामाणिक आणि फायद्याचे सांस्कृतिक सादरीकरण केले.

16 जून रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्याच दिवशी भारतात 37.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर जगभरात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 140 कोटींची कमाई केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube