Download App

Khatron Ke Khiladi 14: अभिषेक कुमार कृष्णासाठी जॅकी श्रॉफच्या घरी गेल्यावर अभिनेत्याची काय प्रतिक्रिया असेल?

Khatron Ke Khiladi 14: शोमध्ये तो अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफसोबत (Krishna Shroff) फ्लर्ट करताना दिसत आहे.

Khatron Ke Khiladi 14: खतरों के खिलाडी 14 हा (Khatron Ke Khiladi 14) सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शोपैकी एक आहे. या शोमध्ये गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani), शिल्पा शिंदे, सुमोना चक्रवर्ती, असीम रियाझ, शालिन भानोत, करणवीर मेहरा, अभिषेक कुमार, आशिष मेहरोत्रा, कृष्णा श्रॉफ, निमृत कौर आणि नियती फतनानी हे कलाकार आहेत.


अभिषेक कृष्णासोबत फ्लर्ट

शोमध्ये अभिषेक कुमारचा (Abhishek Kumar) फ्लर्टी स्टाईल पाहायला मिळत आहे. शोमध्ये तो अभिनेता जॅकी श्रॉफची (Jackie Shroff) मुलगी कृष्णा श्रॉफसोबत (Krishna Shroff) फ्लर्ट करताना दिसत आहे. (Khatron Ke Khiladi 14) मात्र, कृष्णाने त्याला पहिल्याच दिवशी भावाचा टॅग दिला आहे. मात्र, अभिषेक कुमार पहिल्या दिवसापासून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. शोमध्ये बरीच मजेशीर स्टाइल पाहायला मिळते. अलीकडेच या शोचा होस्ट रोहित शेट्टी खेळकर अवस्थेत दिसला. तो अभिषेकची छेड काढताना दिसला.

रोहित शेट्टीने सांगितले की, अभिषेक कुमार कृष्णासाठी जॅकी श्रॉफच्या घरी पोहोचतो तेव्हा जॅकीची प्रतिक्रिया कशी असेल. तो म्हणाला की, शालीनने एक सल्ला दिला होता की, मुलीला इम्प्रेस करायचे असेल तर वडिलांना इम्प्रेस करा. ते जॅकी दा पर्यंत पोहोचले. जॅकी दा म्हणाले, भिडू, अंडा करी, भोपळा भिंडी फ्राय, चिकन कसे बनवायचे ते सांग. मग रोहित म्हणाला की यावर अभिषेक सांगेल तो तिथून बाहेर आला आणि म्हणाला, त्यापेक्षा मी ढाबा काढून बसेल.

खतरों के खिलाडी’मध्ये कृष्णा श्रॉफ पुन्हा करणार धमाकेदार एन्ट्री? अनेक चर्चांना उधाण

अभिषेक कुमारला ‘उदारियां’ या शोमधून प्रसिद्धी मिळाली. यानंतर तो ‘बिग बॉस’मध्ये दिसला. या शोमध्ये तो त्याची एक्स गर्लफ्रेंड ईशासोबत पोहोचला होता. ईशा आणि अभिषेकच्या संदर्भात या शोमध्ये खूप ड्रामा झाला होता. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोपही केले होते. आता अभिषेक खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे.

follow us