Ravindra Mahajani यांचा ‘हा’ सिनेमा शेवटचा ठरला! बाप लेकानं केलं होतं सोबत काम

Ravindra Mahajani यांचा ‘हा’ सिनेमा शेवटचा ठरला! बाप लेकानं केलं होतं सोबत काम

Ravindra Mahajani: रविंद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Ravindra Mahajani Death) रविंद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रविंद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) मराठी- हिंदी मनोरंजन विश्वामध्ये सक्रीय आहे. (Ravindra Mahajani Passed) रविंद्र महाजनी यांच्या शेवटच्या क्षणाला त्यांचं कुटूंबातील त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं हे दुर्दैव आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

विशेष गोष्ट म्हणजे रविंद्र यांनी कारकीर्दीचा शेवटचा सिनेमा त्यांनी आपल्या मुलासोबत केला आहे. रविंद्र महाजनी आयुष्याच्या शेवटच्या कारकीर्दीमध्ये जास्त प्रमाणात काम केले नाहीत. परंतु त्यांना एका सिनेमाची ऑफर आली होती. आणि तो देखील एक ऐतिहासिक सिनेमा असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले आहे. या सिनेमामध्ये रविंद्र महाजनी यांनी मुलगा गश्मीर महाजनी सोबत काम केले आहे. हा सिनेमा म्हणजे पानीपत.

२०१९मध्ये आलेल्या पानीपत सिनेमा हा रविंद्र महाजनी यांनी मल्हारराव होळकरांची भुमिका साकारली तर गश्मीरने तुकोजीवार होळकरांची भुमिका साकारल्याचे दिसून आले आहे. दोघा बाप लेकाने एकाच सिनेमामध्ये एकत्र काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु दुर्दैव म्हणजे, रविंद्र महाजनी आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत होते तर त्यावेळेस त्याच्या घरातील एकही माणूस किंवा मुलगा गश्मीर हा देखील त्यांच्याजवळ नव्हता. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील भाड्याच्या घरामध्ये महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील एका बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.

‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक

गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त लावला जात आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला आहे. यानंतर त्यांचे बालपण मुंबईमध्ये गेले होते. यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित ‘झुंज’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेमाक्षेत्रात एन्ट्री केली होती. तसेच त्यांचे लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे सिनेमे चांगलेच गाजले होते. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती सिनेमामध्ये अभिनय केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube