Download App

Khupte Tithe Gupte: सुबोध भावेच्या उत्तरानं लक्ष वेधलं, म्हणाला.. ‘राहुल गांधींची भूमिका करायला…’

  • Written By: Last Updated:

Khupte Tithe Gupte: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता म्हणजे सुबोध भावे. अभिनय क्षेत्रामध्ये कायम काहीतरी नव्याने करण्यावर या अभिनेत्याचा सतत प्रयत्न असतो. चाहते देखील या अभिनेत्याच्या सर्व प्रयोगांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. अलीकडेच तो ‘हर हर महादेव’ या सिनेमामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये देखील दिसून आला आहे. तर ताज मधून त्याने ‘बिरबल’ही ऐतिहासिक भूमिका देखील साकारली आहे. सुबोध भावेने आतापर्यंत बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर अशा अनेक दमदार चित्रपट दिले आहेत.


नुकतंच त्याला एका राजकारणी नेत्याच्या बायोकपिकमध्ये भूमिका साकारणार का असं विचारणा करण्यात आले होते, यावर त्याने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या टीव्ही शो आणि अनेक सिनेमाची शूटिंगमध्ये व्यस्थ असल्याचे दिसत आहे. अभिनय, दिग्दर्शन सगळ्याचं थरावर सध्या तो कार्यरत आहे. आता लवकरच तो एका नव्या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. नुकतंच सुबोधने झी मराठीचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी लावल्याचे बघायला मिळत आहे.

यावेळी त्याच्यावर अनेक प्रश्नाच्या फैरी करण्यात आले आहेत. त्याला सुबोधने दिलेल्या उत्तरांची देखील आता चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा होस्ट अवधूत गुप्तेने सुबोधला ‘तुला राहुल गांधींची भूमिका साकारायला आवडेल का? असा सवाल करण्यात आला. त्यावर सुबोधनं दिलेल्या उत्तरानं सर्वांचेच लक्ष वेधल्याचे बघायला मिळाले आहे. यावर उत्तर देत असताना सुबोध भावे म्हणाला आहे की, “मी कोणत्या भूमिका करायच्या याचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही तो बघायचा की नाही याचं स्वातंत्र्य तुमचं आहे. मी राहुल गांधींची भूमिका केली तर तुम्हाला बघायलाच पाहिजे याची मी तुम्हाला जबरदस्ती आजिबात केली नाही.

Karachi to Noida: सीमाची प्रेमकहाणी उलगडणार रुपेरी पडद्यावर; ‘कराची टू नोएडा’चे पोस्टर रिलीज

चाहत्यांना उद्देशून सुबोध पुढे म्हणाला की, ‘‘तुमच्या घरात कुठली भाजी करायची हे देखील तुम्हाला विचारलं जात नाही आणि तुम्ही मला मी राहुल गांधींची भूमिका करावी की नाही, याचे सल्ले देत आहात.’’ सुबोध भावेच्या या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. एकदा सुबोध एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधींची भूमिका करायला आवडेल असं म्हणाला होता. तेव्हापासूनच सुबोधला या कारणावरून कायम ट्रोल केलं जात असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी त्याने सत्ताधारी पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे. झी वाहिनीवरील अवधूत गुप्ते याच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरु झाला करण्यात आला आहे. चाहत्यांचा आवडता आणि जबरदस्त कार्यक्रम १० वर्षांनंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाला  अभिनेते, गायक, दिग्दर्शकांसोबतच राजकारण्यांनी देखील या शोला हजेरी लावली.

Tags

follow us