Download App

खुशाली कुमार, मिलिंद सोमन स्टारर ‘स्टारफिश’चा फर्स्ट लूक समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज

  • Written By: Last Updated:

Starfish movie First Look : अभिनेत्री खुशाली कुमार(Khushali Kumar), तुषार खन्ना, मिलिंद सोमण (Milind Soman) आणि एहान भट्ट यांच्या स्टारफिश चित्रपटाचा (Starfish movie) फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. स्टारफिश या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती, हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी खुशालीचा लूक तसेच चित्रपटातील स्टार कास्टचा लूक रिलीज केला. या लूकमुळे चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे.

‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी 

नुकतेच अखिलेश जैस्वाल दिग्दर्शित स्टारफिश चित्रपटाचे शुट पूर्ण झाले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि ऑलमाईटी मोशन पिक्चर्स निर्मित या चित्रपटात खुशाली तारा या स्कुबा ड्रायव्हरची भूमिका साकारत आहे. तिने या चित्रपटात बंडखोर व्यक्तिरेखा साकारली आहे. तर मिलिंद सोमण यांनी आर्लोची भूमिका साकारली आहे, जो आध्यात्मिक गुरू आहे.

मिलिंद सोमण त्याच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे दररोज चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा मिलिंदच्या स्टारफिश चित्रपटातील लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या लूकचा एक व्हिडिओ समोर आला हा व्हिडिओ समोर येताच कमेंट बॉक्समध्ये लोक मिलिंदच्या फिटनेसचे रहस्य विचारत आहेत.

खुशाली कुमार, मिलिद सोमन यांच्याशिवाय, स्टारफिशमध्ये तुषार खन्ना आणि एहान भट हे कलाकारही भूमिका साकारत आहेत. स्टारफिशमधून पदार्पण करणारा तुषार खन्ना, अमनची भूमिका साकारत आहे. एहान भट्ट नीलची भूमिका करत आहे जो मुक्त-उत्साही आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट हात आहे.

अखिलेश जैस्वाल दिग्दर्शित स्टारफिश हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी स्टारफिश प्रदर्शित होईल. स्टारफिश पाहिल्यानंतर प्रेक्षकांना समुद्रात सूर मारून ताजेतवाने वाटेल, असं निर्माते सांगत आहे.

Tags

follow us