‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी

‘देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी’; कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुळे-फडणवीसांची जुगलबंदी

Supriya Sule On Devendra Fadnvis : राज्यात सध्या कंत्राटी भरतीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेण्याचं जाहीर केल्यानंतर विरोधकांवर टीकेची तोफ डागली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला! PM मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लोकार्पण

सुप्रिया सुळे म्हणाल्या, कंत्राटी भरतीचा जीआर 2011 साली निघाला तेव्हा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी सरकारच्या कॅबिनेटमध्ये नारायण राणे, अजित पवार, हसन मुश्रीफ ही सगळी मंडळी होती. फडणवीस जे आरोप करीत आहेत, त्यावर वाटलं होतं की करारा जवाब मिलेगा पण सगळी चुकीची माहिती त्यांनी दिली असल्याचं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

महाविकास आघाडीत ‘वंचित’ची एन्ट्री? शरद पवार अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

तसेच 2011 साली शरद पवार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का? हा तर जोक आहे, अशी उमेद फडणवीसांकडून नव्हती, जे मंत्री तेव्हा कॅबिनेटमध्ये होते तेच आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक

काय म्हणाले होते फडणवीस?
कंत्राटी नोकर भरतीचं पाप महाविकास आघाडीचं आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आमच्या पक्षाकडून त्यांना उघडं करू, या शब्दांत फडणवीसांनी टीका केली.

फडणवीस हाप अॅण्ड वन :
सध्या देवेंद्र फडणवीस संभ्रमात आहेत, त्यांचं डिमोशन झाल्याने मला त्याचं खूप वाईट वाटतयं, मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झाला , त्याचा हाप वन अॅण्ड टू आहे. देवेंद्रजी वन उपमुख्यमंत्री आहेत असं त्यांचे जॅकेटवाले फोटोग्राफर सांगताहेत. डीसीएम 1 असं जॅकेटवर लिहुन त्यांनी नवीनच काहीतरी सुरु केलंयं, जो माणूस सीएम होता तो डीसीएम 1 झाला आहे हे नवीनच महाराष्ट्रात सुरु झालं, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आस्था, आदर, प्रेम आणि अस्वस्थता असून अन्याय झाला असल्याचंही सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन राज्यात परीक्षार्थींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सरकारला चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अखेर राज्य सरकारकडून हा जीआर रद्द करण्यात आला आहे. अशातच आता जीआ रद्द करताना फडणवीसांनीही विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यावरुन सुप्रिया सुळेंना त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुळे यांच्या या प्रत्युत्तरावर देवेंद्र फडणवीस नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube