महाविकास आघाडीत ‘वंचित’ची एन्ट्री? शरद पवार अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

महाविकास आघाडीत ‘वंचित’ची एन्ट्री? शरद पवार अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

Prakash Ambedkar On Sharad Pawar Meet : मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre)राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar )यांची भेट झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही भेट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाची आक्रमक भूमिका

बंद दाराआड शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत एन्ट्री होण्यावर चर्चा झाल्याचीही जनसामान्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या भेटीनंतर वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी कॉफी घेतली आणि त्यामध्ये शरद पवार यांनी साखर घातल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी कॉफी घेण्याशिवाय दुसरं काहीच झालं नाही, असंही यावेळी आंबेडकरांनी सांगितले.

India vs New Zealand : हार्दिक पांड्याच्या जागी कोणाला मिळणार संधी? ‘या’ नावांची चर्चा

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत कॉफी घेतली. आम्ही त्यावेळी 12 जण होतो. एवढ्या जणांच्या उपस्थितीत राजकीय चर्चा होण्याची अपेक्षाच कशी करु शकता. मी महाविकास आघाडीवर बोलणार नाही, असेही यावेळी ते म्हणाले, कारण त्यावर काहीच घडलं नाही. त्याचबरोबर आगामी काळातील पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत त्यामध्ये काही घडेल असंही मला वाटत नाही, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझा भाजपाला कायम विरोध आहे. कॉंग्रेस मला सोबत घेत नाही म्हणून भाजपा आशेवर असेल, तर त्यांनी वाटच बघावी, असेही ते म्हणाले. त्याचवेळी पत्रकारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारताच आंबेडकर यांनी सांगितले की, जरांगे पाटलांशी शासनाने इमानदारीने बोलावं.

चार महिने, दोन महिन्याने देत आहे, असे करु नये. शासनाला सांगतो, गावात गेलो तर 20 ते 25 वर्षांच्या तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांची लग्न झाली नाही, किंवा होत नाहीत. हा लॅन्डेड क्लास आहे, त्यामुळे या वर्गाच्या कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत.

आरक्षण आणि जात गणनेचा संबंध नाही. बिहारमधील जातगणनेतून एकच बाहेर आलं, ते म्हणजे कोणतीही जात प्रबळ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी वर्ष प्लॅनिंग होऊनही आर्थिक दृष्टिकोनातून बदल झाला नाही. राज्यातील जनगणना झाली तर इकॉनॉमिकल असमतोल वाढल्याचे दिसून येईल, त्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे. जरांगे पाटील यांच्या नावाने वादळ उभं राहिलं आहे, त्यावर प्रामाणिक राहावं, असा इशाराही यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube