अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला! PM मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लोकार्पण

  • Written By: Published:
अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला! PM मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लोकार्पण

Navi Mumbai Metro: नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रोला अखेर मुहूर्त मिळाला आहे. नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर आहेत, तेव्हाचं मेट्रोचं लोकार्पण करण्यात येणार आहे. यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाकडून सिडकोला पत्र देण्यात आले आहे. या पत्रात मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रोचे सर्व काम पूर्ण झाले असून पंतप्रधान येत असल्याचे सांगितले आहे.

Earthquake Nepal: नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, बिहारमध्येही हादरली जमीन 

तब्बल 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नवी मुंबईतील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. याआधी नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर आणि त्यानंतर 17 ऑक्टोबर अशी निश्चित करण्यात आली होती. पण, पंतप्रधानांच्या व्यस्ततेमुळे हा कार्यक्रम पुढं ढकलण्यात आला होता. दरम्यान, आता 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत.

विशेष म्हणजे, नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासोबतच त्याच दिवशी राज्य सरकारकडून नमो महिला सक्षमीकरण मोहिमेचा शुभारंभही मुंबईतून केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित नमो महिला सक्षमीकरण अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत. या महिला मेळाव्यास संपूर्ण राज्यभरातून विविध महिला बचत गटांतील एक लाखाहून अधिक महिला सहभागी व्हाव्यात यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत.

नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये CMIES प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. मात्र विविध कारणांमुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. आता 30 तारखेला मेट्रोचे लोकार्पण होणार आहे.

नवी मुंबई मेट्रो लाईन 1 ही फक्त 11.1 किमी लांबीची आहे आणि त्यामुळे बेलापूर ते पेंढार मेट्रो लाईन जोडली जाईल. या मेट्रो मार्गावर एकूण 11 स्थानके असतील. नवी मुंबई मेट्रोचे तिकीट दर 10 ते 40 रुपये असतील. 2 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये आणि 10 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी 40 रुपये तिकीट आकारले जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube