बापरे ! भाजपप्रवेशाच्या चर्चेदरम्यान किच्ची सुदीपला मिळालंय धमकीचं पत्र

Kiccha Sudeep Threatening Letter : कन्नड सुपस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep Threatening Letter) सध्या भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. किच्या सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचे धमकीचं पत्र मिळाले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. Karnataka | […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T114656.547

Kiccha Sudeep

Kiccha Sudeep Threatening Letter : कन्नड सुपस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep Threatening Letter) सध्या भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. किच्या सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचे धमकीचं पत्र मिळाले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे.

नेमकं काय प्रकरण?

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या मॅनेजरला जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. यानंतर बेंगळुरूतील पीएस पुट्टेनाहल्ली येथील पोलिसांनी कलम 120 (ब), 506 आणि आयपीसी कलम 504 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे.

किच्चा सुदीपला धमकीचं पत्र नक्की कोणी दिलं आणि खाजगी व्हिडीओ शेअर करायला कोणी सांगितला याविषयी अद्याप समोर काही आले नाही. या पत्रात किच्चा सुदीपच्या कुटुंबियांना देखील अपशब्द वापरले गेले आहेत. यापत्रामुळे किच्चा सुदीपसह त्याच्या कुटुंबियांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. अभिनेत्याची प्रतिमा खराब करण्यासाठी त्याला हे पत्र पाठवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

‘सर्किट’ मध्ये मिलिंद शिंदेंचा खलनायकी अंदाज

कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीकरिता किच्चा सुदीप भाजपचा प्रचार करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच तो भाजपमध्ये प्रवेश करणार आणि निवडणूक लढवणार की नाही, हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज सुदीपच्या घरी एक बैठक होणार आहे. या बैठकीत तो निवडणूक लढवायची की फक्त प्रचार करायचा याविषयी पुढील नियोजनावर घरातील सदस्यांचे मत घेणार आहे.

Exit mobile version