KGF च्या सह-दिग्दर्शकाच्या 4 वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू

KGF Co-Director Keerthan Nadagouda Son Death : KGF  आणि "सालार" या सुपरहिट चित्रपटाचे सह-दिग्दर्शक कीर्तन नाडागौडा यांच्या

  • Written By: Published:
KGF Co Director Keerthan Nadagouda Son Death

KGF Co-Director Keerthan Nadagouda Son Death : KGF  आणि “सालार” या सुपरहिट चित्रपटाचे सह-दिग्दर्शक कीर्तन नाडागौडा यांच्या 4 वर्षांच्या मुलाचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण भारताचे सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांनी दुःख करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अपघात कसा झाला?

मीडिया रिपोर्टनुसार, 17 डिसेंबर रोजी कीर्तनचा (Keerthan Nadagouda) मुलगा सोनार्श एकटा लिफ्टमध्ये अडकला होता. लिफ्टमध्ये अडकल्याने तो इतका घाबरला की, त्याचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळताच मुलाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु यात कुटुंबाला यश आले नाही. पवन कल्याणने व्यक्त केले दुःख दक्षिण भारतीय सुपरस्टार पवन कल्याणनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कीर्तनच्या मुलावर झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली.

मोठी बातमी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर

पवन कल्याणनेही कीर्तन आणि त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. कीर्तन नाडागौडाने अनेक चित्रपटांचे सह-दिग्दर्शन केले आहे. त्याच्या यादीत “केजीएफ,” “केजीएफ चॅप्टर 2,” आणि प्रभासचा “सलार” यांचा समावेश आहे. वृत्तानुसार, कीर्तन लवकरच एका मोठ्या दक्षिण भारतीय चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रशांत नील या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मात्र चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही.

follow us