Download App

Kiran Mane: किंग खानमुळे किरण माने चर्चेत! काय आहे नेमकं प्रकरण? 

Kiran Mane Post On Jawan: बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर सध्या ‘जवान’ या सिनेमाची चांगलीच हवा सुरू असल्याचे दिसत आहे. किंग खानने या सिनेमातून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. मराठमोळ्या कलाकारांनी देखील किंग खानच्या ‘जवान’ या सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने हे देखील किंग खानचे ‘डाय हार्ट’ चाहते आहे. आता किंग खानमुळे किरण माने यांच्यावर देखील तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचे बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी याबद्दल सांगितले आहे.


किरण माने हे सोशल मीडियावर कायम किंग खान याचं कौतुक करत असताना बघायला मिळालं आहे. ‘जवान’च्या निमित्ताने देखील किरण माने यांनी पोस्ट केली होती. या पोस्टला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता किरण माने यांनी एक नवीन पोस्ट लिहल्याचे बघायला मिळाले आहे. आग्गाग्ग्गगागा… एक लाखाच्या वर लाईक्स… पाचशेच्या वर कमेन्टस्… दोन हजाराच्या वर शेअर्स… आणि तब्बल एक मिलीयन, म्हणजे दहा लाखाच्या वर व्हियूज ! अजूनबी सुरुच आहे. ते ही माझ्या फेसबुक पोस्टवर !! इन्स्टा-युट्यूबवर नव्हे. नादखुळाच !!!

…आजपर्यन्त माझ्या कुठल्याही पोस्टचे लाईक्स मी मोजले नाहीत. हो, पण कोण लाईक करतंय आणि कमेन्टस् काय येताहेत हे मात्र आवर्जुन पहातो, यातून समविचारी लोक कळतात, जवळ येतात. विषारी घाण दूर जाते. नको असलेला कचरा बाहेर जाऊन महाराष्ट्रभरात माझा मित्रमेळा पसरला तो यामुळेच… चाहते, प्रेम करणारी माणसं माझ्याशी संवाद साधू लागली. आयुष्य बहरून गेलं. काही जणांच्या दृष्टीनं हे ‘आभासी जग’ असो, मला मात्र यातून जिवंत, रसरशीत, हाडामासांचा, जीवाला जीव देणारा गोतावळा लाभला. माझ्यावर वाईट वेळ आली होती, तेव्हा अख्ख्या सोशल मिडीयानं आवाज उठवून भल्याभल्यांची हवा टाईट केलीवती, ती उगाच नाय.

Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा ट्रेलर प्रदर्शित

कालपासून मात्र माझ्या फेसबुक अकाऊंटवर छप्परतोड, आजपर्यन्तचा रेकाॅर्डब्रेक कहर झालाय ! मी ‘जवान’च्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला, त्याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, देशभरातून नव्हे, आशियातून नव्हे, तर जगभरातून प्रचंड रिस्पाॅन्स मिळाला. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, साऊथ कोरीया, दुबई, म्यानमार, सौदी अरेबीया, इंग्लंड, अमेरीका, बल्गेरीया वगैरे वगैरे देशांमधले लोक माझ्या पोस्टवर आले. वर आकडे दिलेले आहेत. ते वाढतच चाल्लेत, ‘जवान’च्या करीश्म्यासारखे.

शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श हाय… साध्या गोष्टीचबी सोनं करतोस तू… ‘सिनेमा इंडीया’ जगभरात लखलखतोय, झळाळतोय तुझ्या मिडास टच मुळं ! रूंब रूंब रूंब नांद्री… आणि लब्यू लैच, अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us