Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा ट्रेलर प्रदर्शित

Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा ट्रेलर प्रदर्शित

Khalga Marathi Movie Trailer Out: सध्या मराठी सिनेमाबद्दलच्या कथेची आणि आशयघन कथानकाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. सिनेमाचे कथानक, बोलीभाषेमधील संवाद, कलाकाराचा अभिनय या गोष्टींच्या आधारे सध्याचा प्रेक्षकवर्ग देखील सिनेमा पाहावा की नाही हे ठरवत असतात. अशातच आता सध्या सोशल मीडियावर एका आशयघन कथानकाची आणि उत्तम कथा असलेल्या हृदयस्पर्शी ट्रेलरची जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. थरारक, रहस्यमय विषयावर सडेतोड भाष्य करणाऱ्या आणि सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या ‘खळगं’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=dtn1VONxq-c

ट्रेलर प्रदर्शित होताच सिनेमाच्या कथानकाची जोरदार चर्चा होत आहे. सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला नवोदित कलाकार येणार आहेत. ट्रेलर झालेल्या कथेमध्ये, पोलीस होण्याची उमेद, उराशी बाळगलेलं स्वप्न ‘एका आई लेकाची’ सुरू असलेली जोरदार धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग या सर्व गोष्टी आपल्याला ट्रेलरमधून बघायला मिळत आहे. नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय हा खरंच वाखाणण्याजोगा असल्याचे दिसत आहे. गावखेड्यातील आणि सत्यघटनेवर आधारित ‘खळगं’ या सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची मोठी उत्सुकता ताणून धरल्याचे बघायला मिळत आहे.

तसेच अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथा सांगणाऱ्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्याकडे सोपण्यात आली आहे. ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत सिनेमाच्या निर्मितीची धुरा ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’सह गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी निर्मातीची जबाबदारी दिली आहे. तर सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट, अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे. तसेच सिनेमाची कथा, पटकथा, संवाद शिवाजी दोलताडे, गोवर्धन दोलताडे यांचे आहे, सिनेमाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी चांगलीच साकारली आहे.

Ira Khan: ‘आत्महत्येचा विचार…’, आमिरच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत माधवी जुवेकर, कार्तिक दोलताडे, सुलतान शिकलगार, रोशनी कदम, प्रज्वल भोसले, प्रितम भंडारे, कल्यानी पवार, शिवाजी दोलताडे, माणिक काळे, वैष्णवी मुरकुटे, ज्वालामुखी काळे, भैरव जाधव, संकेत कवडे, शिल्पा कवडे, मयूर झिंजे, मोहन घोलप, मंगेश ससाणे, ऐश्वर्या लंगे, गणेश शिंदे, शरद पवार हे कलाकार आहेत. नवोदित अभिनेत्यांनी या सिनेमात अभिनय केला आहे, तसेच सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची देखील उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ सप्टेंबर दिवशी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राभर धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube