Kishor Kadam Poet : अभिनेते आणि कवी किशोर कदम (Kishor Kadam) यांनी टोल (Toll) संदर्भात एक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का ? अरे लूट थांबवा रे ही, लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?कुणाकडे तक्रार करायची ? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?’ असं म्हणत त्यांनी टोल संदर्भात अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी एक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
Sachin Tendulkar च्या ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, आमची नोटीस तयार
काय आहे किशोर कदम यांची पोस्ट?
टोल नाक्यांवरील टोल वसुली संदर्भात संताप व्यक्त करणाऱ्या पोस्टमध्ये अभिनेते आणि कवी किशोर कदम (Kishor Kadam) म्हणाले, ‘मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस हायवेवर 240 टोल घेतात. मधे मनःशांती वगैर काही खायला लोणावळ्यात उतरलं की, वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात ? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का ? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ? अरे लूट थांबवा रे ही, लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?कुणाकडे तक्रार करायची ? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?’ असं म्हणत त्यांनी टोल संदर्भात अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी एक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाली होती ऋजुता देशमुख?
दरम्यान या अगोदर अभिनेत्री ऋजुता देशमुखने देखील टोल संदर्भात संताप व्यक्त केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, “सामान्यपणे मुंबई- पुणे हायवेवर प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्यावर 240 रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर 80 रुपये टोल घेतला जात आहे. मी पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता की, त्यामध्ये खालापूरला 240 आणि तळेगावला 80 ऐवजी 240 रुपये वजा करण्यात आले होते. म्हणजे एकूण 480 रुपये टोल गेला होता. याची मी रितसर तक्रार केली. परंतु अजून देखील मला त्याचे उत्तर मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी (1 ऑगस्ट) पुन्हा मुंबईला जायला निघाले, तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून मी तेथील मॅनेजरला भेटले. तेव्हा त्याने मला सांगितले की, मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापण्यात आला असल्याची माहिती यावेळी त्याने दिली.
Chandrayan – 3 उतरलेल्या भागाला ‘शिवशक्ती’ पॉईंट हे नाव का देण्यात आले?
आता मुंबई ते लोणावळा 240 आणि लोणावळा ते पुणे 240 असे दोन भाग झाले आहेत. जेव्हापासून फास्ट टॅग सुरु झाला तेव्हापासून हे सुरु झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या टोलच्या मॅनेजरने मला 2 टप्पे केल्यामुळे असा टोल कापल्याचे थेट उत्तर दिले. खरेतर मुंबई ते लोणावळा 83 किलोमीटर अंतर आहे तर, लोणावळा ते पुणे 64 किलोमीटर अंतर आहे. फक्त लोणावळ्याला थांबले म्हणून डबल टोल? यावर मला अजून देखील कोणतेही उत्तर मिळाले नाही. अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम होईल याची खात्री नसते. यावेळी मनात आले, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो योग्यरित्या आहे का?” असा सवाल अभिनेत्री ऋजुता देशमुखने या व्हिडीओमार्फत उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले आहे.