Download App

किसी का भाई किसी की जान Review : रेंगाळलेला कंटाळवाणा चित्रपट, सलमानचा स्वॅग आणि अँक्शनने वेधलं लक्ष

  • Written By: Last Updated:

सलमान खान हा बॉलिवुडचा स्टार आणि चाहत्यांचा भाईजान म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा चित्रपट म्हंटला की मनोरंजनाची हमी असते. मात्र किसी का भाई किसी की जान हा चित्रपट मनोरंजनाच्या बाबातीत कमी पडलाय. तामिळ फिल्म विरमचा हा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाला साऊथ तडका देऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय. फरहाद सामजीचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट कमजोर पटकथेमुळे कंटाळवाणा ठरतोय.

प्राजक्ता माळीच्या फोटो पोझ पाहून चाहते भडकले

चित्रपटाची कथा आहे भाईजान आणि त्याच्या तीन भावांची. लव्ह, इश्क आणि मोह या तिन्ही भावांचा लहानपणापासूनच सांभाळ भाईजानने केलाय. या सगळ्यात भाईजानच्या आयुष्यात येते भाग्या, जिच्या येण्याने भाईजानचं आयुष्य कसं बदलतं आणि या सगळ्यात चित्रपटात येणारे नवनवीन ट्विस्ट बघायला मिळतात. चित्रपटाच्या कथेत काही वेगळेपण जाणवत नाही. चित्रपटाची कमजोर पटकथा, निराधार संवाद यांच्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटतो. भाईजानची एन्ट्री मात्र सुरुवातीला धमाकेदार होते. चित्रपटाचा पूर्वार्ध कंटाळवाणा ठरतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात कथेनं वेग पकडलाय आणि साऊथ तडका आल्याने कथा काही काळ गुंतवून ठेवते.

सलमान खानचा हटके लुक या चित्रपटात पाहणं महत्त्वाचं ठरतं. वेगवेगळे लुक, खास एन्ट्री, क्लोज अप शॉट्स, हाय स्पिड स्लो मोशन एक्शन या सगळ्यात सलमान खान लक्ष वेधून घेतो. असं असलं तरी सलमान खानचे भावूक सीन किंवा संवादशैली अतिशय नाट्यमय वाटते. पूजा हेगडेसाठी भाग्याच्या भूमिकेत अभिनयकौशल्यासाठी बराच वाव होता. मात्र ही भूमिका चोख बजावण्यात ती कमी पडल्याचं जाणवतं. शिवाय सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्री खुलण्यात अपयश आलय.

सलमान खानसह या चित्रपटात पुजा हेगडे, साउथ स्टार दग्गुबती व्यंकटेश, भुमिका चावला, राघव जुयाल, जस्सी गिल, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, विनाली भटनागर, रोहिणी हट्टंगडी, विजेंदर सिंह, सतीश कौशिक, आसिफ शेख, तेज साप्रू, जगपथी बाबू या आणि इतर कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळतेय. इतके कलाकार असले तरी काही कलाकारांच्याच वाट्याला प्रभावी सीन आल्याचं दिसतं. रोहिणी हट्टंगडी, सतीश कौशिक या दिग्गज कलाकारांनी चित्रपटातील काही सीन छान खुलवलेत. या अनुभवी कलाकारांचे प्रभावी सीन पाहायला मिळतात.

राघव जुयाल, जस्सी गिल, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, विनाली भटनागर या कलाकारांना या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला असला तरी अभिनयकौशल्य दाखवण्यात त्यांना चित्रपटात वाव दिसत नाही. चित्रपटाची एक्शन दमदार आहे. हाय स्पिड शॉटचे छायांकन उत्तम करण्यात आलय. चित्रपटाचं संकलनही छान वाटतय, ज्यात कलर ग्रेडिंगही चांगलं वाटतय.

चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र कथेला साजेसं वाटत नाही. चित्रपटाची गाणीही आकर्षक वाटत नाहीत आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपय़शी ठरतात. दिग्दर्शक फरहाद सामजीने केलेल्या चित्रपटाच्या सादरीकरणात कथेचा सार हरवलेला जाणवतो. हा चित्रपट कथेसोबत प्रेक्षकांना कनेक्ट करण्यात कमी पडतोय. मात्र चित्रपटाची दमदार एक्शन आणि सलमान खानचा स्वॅग या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

रेटिंग – 1.5 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक

Tags

follow us