थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात रसिकांना घेता येणार ‘कोलाहल’ चा आस्वाद

Kolahal : 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची (Third Eye Asian Film Festival) शानदार सुरुवात झाली असून विविध आशियाई देशांतील

Kolahal

Kolahal

Kolahal : 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची (Third Eye Asian Film Festival) शानदार सुरुवात झाली असून विविध आशियाई देशांतील चित्रपटांची मेजवानी रसिकांना  मिळत आहे. या महोत्सवात अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) आणि  शुभांगी भुजबळ (Shubhangi Bhujbal) यांची भूमिका असलेल्या ‘कोलाहल’ या लघुपटाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

बुधवार 15 जानेवारीला अंधेरीच्या मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात दुपारी 2.15 वा. हा लघुपट रसिकांना पहाता येईल. सोनाली लोहार  लिखित आणि संतोष पाठारे  दिग्दर्शित ‘कोलाहल’ या लघुपटाची कथा ऐकू न येणाऱ्या एका स्त्री भोवती फिरते. थर्ड आय आशियाई चित्रपट या नावाजलेल्या महोत्सवात ‘कोलाहल’चे विशेष स्किनिंग होत असल्याचा आनंद अभिनेत्री स्मिता तांबे हिने व्यक्त केला.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसांठी स्मिता तांबे ओळखली जाते. ‘कोलाहल’ लघुपटातील भूमिका आणि हा लघुपट प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास दिग्दर्शक संतोष पाठारे यांनी व्यक्त केला. या लघुपटाची निर्मिती रुपाली भारद्वाज आणि आरती पाठारे यांनी केली आहे.

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया 

या महोत्सवात नव्या दमाच्या दिग्दर्शकांचं विशेष सत्र आयोजित करण्यात  येणार आहे.  या चर्चा सत्रात देश-विदेशातील दिग्दर्शक चित्रपटातील आपले अनुभव  व  चित्रपट विषयाशी निगडीत चर्चा  करणार आहेत. चर्चेत चंदन आनंद, सनी हिंदुजा या  दोन  होतकरू दिग्दर्शकांसोबत हिरेन बोरा, जदुमणी दत्ता, समिक रॉय चौधरी हे देखील सहभागी होणार आहेत.

Exit mobile version