Mahesh Manjrekar : महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ (Kon Hona Maharashtracha Ladka Kirtankar) या लोकप्रिय शो ची भुरळ अगदी सेलेब्रिटीनांही पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी नुकतीच या मंचावर उपस्थिती लावली.
महेश मांजरेकर यांनी या शोसाठी खास धोतर-कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. अशा प्रकारचा शो करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून, सोनीने आणलेल्या अनोख्या संकल्पनेला त्यांनी मनापासून दाद दिली. यावेळी महेश मांजरेकर यांनी विठ्ठलाचं सुरेख गाणं सादर केलं. या कीर्तनकारांचे सादरीकरण बघून मला ही गाणं सादर करण्याचा मोह आवरला नाही, असं महेश मांजरेकर यांनी यावेळी सांगितले.
‘विठूचं नाव मनी जोडलं’ असं म्हणत त्यांनी विठुरायाला घातलेली साद परीक्षकांसह उपस्थितांनाही भावली. महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना भेटता आल्याचा आनंद स्पर्धकांनी व्यक्त केला.
“क्रांतीवीर चापेकर स्मारक विद्यार्थ्यांना दाखवा, त्यासाठी व्यवस्था करा”; CM फडणवीसांच्या सूचना
सोनी मराठी वाहिनीवर लवकरच हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री 8.00 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.