Devmanus Film : देवमाणूसविषयी महेश मांजरेकर काय म्हणाले? त्यांच्यासाठी देवमाणसं कोण?

Mahesh Manjrekar : तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ (Devmanus) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, शिवाजी साटम, विक्रम गोखले हे माझ्यासाठी देवमाणूस असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं.
‘… सितारों के साथ, भव्य सोहळा!’ 13 एप्रिल रोजी स्टार प्लसवर ‘बैसाखी मिलन’
देवमाणूसच्या निमित्ताने बोलताना मांजरेकर म्हणाले की, ज्या लोकांनी मी माहिती आहे, त्यांच्यासाठी मी अगदी तसाच आहे. माझा स्पॉटबॉय देखील माझ्या खांद्यावर कधीही हात टाकून माझ्याशी बोलू शकतो. मीही त्याच्या डब्यात कधी जाऊन खाऊ शकतो. पण, आपल्याला खोटं वलय, खोटी इमेज निर्माण करावी लागते. तसं केलं नाहीतर उद्या कुणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतोय.
एकनाथ शिंदेंचा फोन…भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागं नेमकं घडतंय काय?
चित्रपटातील रोलविषयी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मला बहुतेक निगेटिव्ह शेड्स असलेले रोल मिळाले. त्यामुळं जुनं पर्निचर मीच लिहिलं आणि मीच काम केलं. मी असे रोल करू शकतो, हे त्यातून सिद्ध झालं. देवमाणूस सिनेमा मला ऑफर झाला. यातला केशवराव मी साकारला. केशवराव हे समाधानी जीवन जगणारे पात्र आहे. तो माळकरी, पांडुरंगाचा भक्त, खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असा आहे. काही माणसं अशी असतात, जी आपल्याला खूप काही मिळालं तरी दुसऱ्याला जास्त मिळालं याचं दु:ख करत असतात. केशवराव तसा नाही. काही गोष्ट कमी मिळाल्या, विरुध्द गेल्या तरी तो सुखी असतो. खरंतर हा रोल मला करता आला याचा आज मला आनंद आहे. हा रोल अनेकांनी चांगला केला असता. पण, सिनेमा एडीट झाल्यानंतर मी पाहिले, तेव्हा हा रोल किती चांगला केला किंवा किती वाईट केला, हे मला माहिती नाही. पण, हा मी रोल मी का केलाय? याचा पश्चाताप झाला नाही. उलट आनंद झाल्याचं मांजरेकर म्हणाले.
पुढं बोलताना ते म्हणाले, मी खूप अभिनेत्यांना माझ्या कामाचं क्रेडीट देतो. रोल चांगला करण्यासाठी कशी तयारी करावी हे मी या अभिनेत्यांकडून शिकलो. माझ्यासाठी नसिरुद्दीन शहा, अमिताभ बच्चन, शिवाजी साटम हे सगळे देवच आहेत. सर्वात मोठा देव विक्रम गोखले आहेत. अभिनेत्यांनं सहज आणि नॅचरली कसं काम करावं, हे मी त्यांच्याकडून शिकलो, असं मांजरेकर म्हणाले.
दरम्यान, ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलंय. हा चित्रपट 25 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.