‘देवमाणूस’ च्या निमित्ताने नेहा शितोळेचे लेखन क्षेत्रात पदार्पण, महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका

Neha Shitole : लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ (Sitaramam) या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता देवमाणूस ह्या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.
तेजस देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) , रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित आहे.
लेखकाच्या भूमिकेत पदार्पण करताना नेहा सांगते, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री ह्या नात्याने आत्ता पर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली”
ती पुढे म्हणते, ”‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”
‘गुलकंद’ मधील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित…
लव फिल्म्स प्रस्तुत, “देवमाणूस” या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.