‘… सितारों के साथ, भव्य सोहळा!’ 13 एप्रिल रोजी स्टार प्लसवर ‘बैसाखी मिलन’

‘… सितारों के साथ, भव्य सोहळा!’ 13 एप्रिल रोजी स्टार प्लसवर ‘बैसाखी मिलन’

Baisakhi Di Raat Sitaron Ke Saath On Star Plus : भारतीय मूल्ये, संस्कृती आणि भावबंध प्रतिबिंबित करणाऱ्या कथांना ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. एकता आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची प्रथा-परंपरा या वाहिनीने कायम सुरू ठेवली आहे. यंदाच्या उत्सवाच्या हंगामात, ‘स्टार प्लस’ वाहिनीने ‘बैसाखी मिलन’ (Baisakhi Milan) सादर केले. हा एक उत्साहाने काठोकाठ भरलेला उत्सव (Entertainment News) आहे, ज्यात व्यक्तिगत मालिकेच्या पलीकडे पोहोचत पडद्यावर एक भव्य सांस्कृतिक क्षण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

या ‘बैसाखी मिलन’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘स्टार प्लस’ वाहिनी अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, गुम है किसीके प्यार में, उडने की आशा, अॅडव्होकेट अंजली अवस्थी, पॉकेट में आसमान, जादू तेरी नजर, झनक आणि इस इश्क का रब्ब रखा यासारख्या लोकप्रिय मालिकांमधील प्रिय पात्रांना एकत्र आणत आहे.

काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं.., अजितदादांचं बारामतीत मिश्किल वक्तव्य

या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत आगामी ‘बैसाखी दी रात सितारों के साथ’ कार्यक्रमाची एक उत्फुल्ल झलक बघायला मिळते. हा संगीत, नृत्य, परंपरा आणि आनंद फुलवत कलाकारांना पुन्हा एकत्र आणणारा बहुरंगी उत्सव आहे. नवा प्रारंभ आणि सुबत्तेचे प्रतीक असलेला ‘बैसाखी’ हा सुगीचा सण साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’ वाहिनीचे कलाकार एकत्र येत आहेत. हे कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्सवी अवतारात दमदार पावले टाकत व्यासपीठावर बैसाखी नव्या तेजाने जिवंत करत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रोमोत- कार्यक्रमातील काही हृदयस्पर्शी क्षण, उत्साहात सादर करण्यात आलेली कलात्मक सादरीकरणे आणि संपूर्ण देशासह उत्सवाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकप्रिय कलाकारांच्या चेहऱ्यावर झळकणारा उत्साहाची झलक बघायला मिळते.

रत्नागिरीला भाजपचा बालेकिल्ला बनवणार; मंत्री राणेंच्या मनात नक्की काय?

परंपरा आणि उत्सवाला व्यासपीठ देण्याचा वारसा कायम राखीत ‘स्टार प्लस’ वाहिनी बैसाखीचे भरभरून स्वागत करण्यास सज्ज झाली आहे. हा प्रोमो जणू सद्भावनेचे एक प्रतीक आहे. विश्वासाचे मजबूत संबंध आणि उत्सुक शक्यतांना सूचित करणारी एक कृती आहे. याआधी ‘स्टार परिवार’ने ‘महामिलन’चे आयोजन केले होते, जिथे प्रेक्षकांना वेगवेगळ्या कार्यक्रमांतील पात्रांनी एकत्रितपणे सादरकरणे करून एक संस्मरणीय मेजवानी प्रेक्षकांकरता पेश केली होती. या उपक्रमाअंतर्गत वाहिनीवरील विविध मालिकांतील अथवा कार्यक्रमांतील कलाकारांनी इतर कार्यक्रमांना विशेष भेटी दिल्या होत्या. त्यातून मजेदार संभाषणे आणि नाट्याचे, आनंदाचे अनपेक्षित क्षण निर्माण झाले होते. ‘बैसाखी मिलन’ या नव्या कार्यक्रमात याची पुनरावृत्ती होईल का?

 

View this post on Instagram

 

A post shared by StarPlus (@starplus)

नृत्य सादरीकरणाच्या व्यासपीठावर एक आश्चर्यकारक वळण बघायला मिळेल की एखादी अनपेक्षित जोडी हे व्यासपीठ गाजवेल? व्यासपीठ सज्ज आहे, कलाकार तयारीत आहेत आणि एक बहुरंग, बहुढंगी उत्सव सुरू होत आहे. 13 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा पासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘बैसाखी दी रात सितारों के साथ’ हा बैसाखीचा भव्य सोहळा बघण्यास विसरू नका!

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube