Kon Honar Crorepati : नाकात नथ अन् गुलाबी नऊवारी…’माधुरी’च्या लुकने चाहत्यांची मने जिंकली!

Kon honar Karorepati : कोण होणार करोडपतीच्या दिवाळी विशेष भागात माधुरी दिक्षीतच्या मराठमोळ्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Kon Honar Karorepati

Kon Honar Karorepati

Madhuri Dixit Kon honar Karorepati : ‘कोण होणार करोडपती’च्या (Madhuri Dixit Kon honar Karorepati) मंचावर यंदाची दिवाळी खास मराठमोळ्या अंदाजात साजरी होणार आहे. या खास दिवाळी विशेष भागामध्ये या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका माधुरी खास मराठमोळ्या पारंपरिक नऊवारी साडीत दिसणार आहे.

या खास भागासाठी माधुरीनं गुलाबी रंगाच्या सुंदर नऊवारी साडीची निवड केली असून या साडीला असलेली उठावदार सोनेरी किनार तिच्या मोहक सोज्वळ लूकमध्ये अधिकच भर घालते. पारंपरिक नऊवारी साडीतील माधुरीचा हा देखणा अंदाज दिवाळीच्या उत्साहाला साजेसा ठरेल.

या दिवाळी विशेष भागामध्ये माधुरीनं आपल्या या पारंपरिक लूकला साजेसे दागिनेही परिधान केले आहेत. गळ्यातील सुंदर सोन्याचा हार, उठावदार कानातले, पारंपरिक नथ आणि हातातील सोन्याच्या बांगड्यांनी त्यांच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. केसांची नीटनेटकी बांधणी करून त्यात माळलेली गुलाबी फुलं आणि कपाळावरील लाल टिकली यामुळे तिचा हा मराठमोळा साज अधिकच खुलून दिसतो आहे.

दरम्यान, माधुरीच्या या खास मराठमोळ्या पारंपरिक लूकसाठी पहात रहा ‘कोण होणार करोडपती’चा हा दिवाळी विशेष भाग शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव वर.

Exit mobile version