Download App

Khatro ke Khiladi मध्ये दुखापत; कृष्णा श्रॉफने तरीही खंबीरपणे केला खास स्टंट

Krishna Shroff तिच्या साहसी प्रयत्नांसाठी ओळखली जाते. अलीकडेच लोकप्रिय रिॲलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये अनोख्या शैली दाखवताना ती दिसली.

Krishna Shroff injuird in Khatro ke Khiladi : कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) तिच्या साहसी प्रयत्नांसाठी ओळखली जाते. अलीकडेच लोकप्रिय रिॲलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये (Khatro ke Khiladi) अनोख्या शैली दाखवताना ती दिसली. एका स्टंट दरम्यान कृष्णा श्रॉफला तिच्या कोपरावर गंभीर जखम झाली. तिने धीर धरून खंबीरपणे यातून मार्ग काढला आणि आव्हानं स्वीकारल.एका सोशल मीडिया पोस्ट मधून कृष्णा श्रॉफ खऱ्या चॅम्पियन सारखी दिसत आहे.

पुणे पोलीस भरतीच्या तारखा जाहीर, ४९६ जागांसाठी ‘या’ दिवशी होणार मैदानी परीक्षा

खतरों के खिलाडी मध्ये भाग घेणे ही काही छोटी कामगिरी नाही. हा शो त्याच्या स्टंट सारखी ओळखला जातो. कृष्णा श्रॉफ तिच्या आयुष्याकडे निडर दृष्टिकोनाने अनेकांना प्रेरणा देत आहे. कृष्णा कायम तिच्या कामातून सगळ्यांना प्रेरणा देत असते आणि या कार्यक्रमातून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Kalki 2898 AD: प्रभास- दिलजीतच्या ‘कल्की 2898 एडी’चे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला

दुसरीकडे उद्योजक म्हणून देखील नावारूपास आली आहे. तीने मॅट्रिक्स फाईट नाईटचे MMA उत्साही लोकांसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवले आहे. स्टिरियोटाइप तोडण्याचा आणि यथास्थितीला आव्हान देण्याच्या तिच्या निर्धाराने एक उद्योजक म्हणून तिची क्षमता सिद्ध केली आहे आणि ती महत्वाकांक्षी नेत्यांसाठी एक आदर्श बनली आहे. तिच्या पदोन्नतीने अंशुल जुबली आणि पूजा तोमर यांसारख्या भारतीय प्रॉस्पेक्ट्ससाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम केले आहे.

कोण आहे कृष्णा श्रॉफ?

अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ लाईमलाईटपासून दूर असते. तरी खऱ्या आयुष्यात ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा आजिबात कमी नाही. तसंच भाऊ टायगर श्रॉफ सारखीच ती देखील फिटनेसफ्रिक असल्याचे कायम पाहायला मिळत असत. कृष्णा सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. तिचे फिटनेससंबंधित फोटो व्हिडिओ ती अपलोड करत असते. प्रसिद्धीपासून दूर असूनही तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग मोठा आहे.

follow us

वेब स्टोरीज