Download App

Guns and Gulaabs Trailer : राजकुमार रावच्या ‘गन्स एंड गुलाब्स’ मध्ये दिसणार दिवंगत अभिनेते सतिश कौशिक, ट्रेलर रिलीज…

Guns and Gulab’s Trailer : 2023 मधील अभिनेता राजकुमार रावची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरज ‘गन्स अॅंड गुलाब’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये राजकुमार रावसह दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत असणार आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि कॉमेडी असं कॉबिनेशन पाहायला मिळणार आहे. ( Late actor Satish Kaushik in Rajkumar Rao’s web series Guns and Gulab’s Trailer release)

राहुल गांधींना झापलं, सुरत कोर्टाला अन् गुजरात हायकोर्टाला फटकारलं : सुप्रीम कोर्टात काय घडलं?

कसा आहे ट्रेलर?
2.51 सेकंडच्या या ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि कॉमेडी असं कॉबिनेशन पाहायला मिळत आहे. यामध्ये राजकुमार रावसह दुलकर सलमान या दोघांची जबरदस्त झलक पाहायाला मिळत आहे. तर यामध्ये विशेष लक्ष वेधत आहे ते म्हणजे बॅकग्राऊंडला दिवंगत अभिनेते सतिश कौशिक यांचा आवाज एकू येत आहे. तर गांची य भूमिकेत सतिश कौशिक दिसत आहेत. तर दुलकर सलमान हा फॅमिली मॅन अर्जुनच्या भूमिकेत, राजकुमार राव पाना टीपूच्या भूमिकेत, गुलशन देवैया आत्मारामच्या भूमिकेत दिसणार आहे.

Pune News : ‘माझ्या संपूर्ण शरिरावर बॉम्ब’; ज्येष्ठ महिलेच्या धमकीनं पुणे एअरपोर्टवर खळबळ…

या सीरीजसाठी राज निदिमोरु आणि कृष्णा डी.के. यांनी नेटफ्लिक्ससोबत अत्यंत मेहनत घेतली आहे. डी2 आर बॅनरखाली ही सीरीज बनवण्यात आली आहे. या सीरजबद्दल सांगताना राज निदिमोरु आणि कृष्णा डी.के. म्हणाले की, ‘गन्स एंड गुलाब्स’ ही सारीज आमच्यासाठी अत्यंत रोमांचक यात्रा होती. आमच्या मागच्या 99 आणि शोर इन द सीटी या सीराजच्या कथेच्या शैलीकडे आम्ही पुन्हा वळालो आहोत. तर नेटफ्लिक्स देखील आमच्या सारखंच नाविन्यपूर्ण कथा पडद्यावर आणते. तर बहुप्रतिक्षित वेब सीरज ‘गन्स अॅंड गुलाब’ 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us