Download App

Veda Movie : वेदासाठी बॉक्सिंग शिकली! शर्वरीने स्वीकारला ॲक्शन चित्रपटासाठी ‘बीस्ट मोड’  

Veda Movie : बॉलीवूड (Bollywood) सुपर स्टार जॉन अब्राहमचा (John Abraham) 15 ऑगस्टला वेद चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात

  • Written By: Last Updated:

Veda Movie : बॉलीवूड (Bollywood) सुपर स्टार जॉन अब्राहमचा (John Abraham) 15 ऑगस्टला वेद चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडची उगवती स्टार शर्वरी (Sharvari) जॉन अब्राहमच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी शर्वरीने खूप मेहनत देखील घेतली आहे.

नुकतंच तिने सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये ती बॉक्सिंग करताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये शर्वरी तिच्या अष्टपैलू अभिनयासाठी आणि आकर्षक उपस्थितीसाठी ओळखली जाते. शर्वरीने सोशल मीडियावर पोस्टच्या सिरीजद्वारे चित्रपटात तिची भूमिका प्रामाणिकपणे साकारण्यासाठी बॉक्सिंग कसे शिकले हे शेअर केले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, वेदासाठी बीस्ट मोड चालू आहे!

वेद 15 ऑगस्टला थिएटरमध्ये

तिची ॲक्शन कौशल्ये परिपूर्ण करण्यासाठी शर्वरीचे समर्पण तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ती तिच्या आगामी ‘अल्फा’ प्रोजेक्टची तयारी करत आहे, ज्यामध्ये ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

बांगलादेशात परिस्थिती चिघळली, आंदोलकांनी हॉटेलला लावली आग, 24 जणांना जिवंत जाळले

हा चित्रपट YRF Spy Universe चा एक भाग आहे. YRF Spy Universe  हाय- ॲक्शन आणि मनोरंजक स्टोरीसाठी ओळखला जातो. त्यामुळे शर्वरीची कारकीर्द वेगाने वाढत आहे आणि ती भारताची पुढची मोठी ॲक्शन स्टार बनण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही हे देखील आता सिद्ध होत आहे.

follow us