बांगलादेशात परिस्थिती चिघळली, आंदोलकांनी हॉटेलला लावली आग, 24 जणांना जिवंत जाळले

बांगलादेशात परिस्थिती चिघळली, आंदोलकांनी हॉटेलला लावली आग, 24 जणांना जिवंत जाळले

Bangladesh Protests : सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात बांगलादेशात (Bangladesh) गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनात आतापर्यंत 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. यातच 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला आहे सध्या ते भारतात आहे.

तर दुसरीकडे बांगलादेशात सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. सोशल मीडियावर सध्या अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लूटमार आणि दंगली होताना दिसत आहे.

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणात दंगली होताना दिसत आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेत्याच्या हॉटेलला आग लावली आहे, ज्यात 24 लोकांना जिवंत जाळण्यात आले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.  या धक्कादायक घटनेचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आली आहे मात्र तरीही देखील बांगलादेशात मोठ्या प्रमाणात लूटमार आणि दंगली होत आहे.

मृतांची संख्या 440 वर पोहोचली

सरकारविरोधी निदर्शनांमध्ये मंगळवारी मृतांची संख्या 440 वर पोहोचली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि सैन्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गस्त घालत आहे मात्र तरीही देखील बांगलादेशात मोठ्या प्रमाणात दंगली सुरु आहे.

सैन्यात मोठे फेरबदल

तर दुसरीकडे लष्करात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल मोहम्मद शाहीनुल हक यांची कमांडंट एनडीसी आणि मेजर जनरल एएसएम रिदवानूर रहमान यांची एनटीएमसीचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ISPR ने दिली.

पक्षात बदमाशाला स्थान नाही कारण …, क्रॉस वेटिंग प्रकरणात नाना पटोलेंचा आमदारांना इशारा

शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर लष्करप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत देशात अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच आंदोलकांना सांगितले होते की, तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तुम्ही तोडफोडीपासून दूर राहा. तुम्ही आमच्यासोबत आले तर निश्चित परिस्थिती बदलेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube