John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
John Abraham New Bungalow: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham ) नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने एक नवीन घर विकत घेतले आहे, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. त्यांनी रिअल इस्टेट मार्केटमध्ये बंगल्यासाठी मोठी डील केली आहे. जॉनने लिंकिंग रोडवर सुमारे 71 कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. यासाठी त्याने 4.24 कोटी रुपये स्टँप ड्यूटी भरल्याचे सांगितले जात आहे. निर्मल भवन असे या बंगल्याचे नाव असून तो सुमारे 7,722 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. 27 डिसेंबर रोजी अभिनेत्याने मालमत्ता नोंदणी केली.
View this post on Instagram
वांद्रे, खार संकुलात अनेक बॉलीवूडचे तारे आणि उद्योगपती राहतात. मुंबईतील पॉश एरियापैकी हे एक आहे. आमिर खान आणि प्रीती झिंटा सारख्या स्टार्सनीही इथे घरं घेतलं आहे. अशा परिस्थितीत जॉन आता येथे घर विकत घेऊन त्यांचा शेजारी बनला आहे. सोबतच प्रीती झिंटाच्या घराबद्दल बोलायचे झाले तर तिने पाली हिल कॉम्प्लेक्समध्ये 17.01 कोटी रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला होता.
जिप्सी कधीच विकत घेता आली नाही: जॉन अब्राहमने मोठ्या अडचणींसह यश मिळवले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ- उतार पाहिले आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, त्याने त्याच्या आयुष्यात असे दिवसही पाहिले आहेत, जेव्हा त्याला जिप्सी विकत घेता आली नव्हती. जॉनने सांगितले होते की, तो शाळेत असताना त्याच्या वडिलांना त्याच्या साथीदाराने फसवले होते. त्यावेळी त्यांनी जिप्सी बुक केली होती. तो क्षण आठवून अभिनेत्याच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यावेळी त्यांचे वडील खूप भावूक झाले होते. त्यावेळी वडिलांनी सांगितले की, उद्या टेबलावर जेवण कसे मिळेल हे माहीत नाही. याच कारणामुळे जॉनच्या वडिलांना ती जिप्सी विकत घेता आली नाही. त्यावेळी जॉनने ठरवले होते की, आयुष्यात एक दिवस तो नक्कीच जिप्सी विकत घेईल. नंतर त्याने एक जिप्सीही घेतली.
‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, पण 10व्या दिवशी ‘जवान’चा रेकॉर्ड मोडणं झालं मुश्किल
जॉन अब्राहमसाठी 2023 उत्तम ठरले: जॉन अब्राहमसाठी 2023 हे वर्ष उत्तम ठरले. या वर्षी त्याने शानदार पुनरागमन केले. अभिनेता पडद्यावर खलनायक बनला होता. त्याने शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात काम केले होते आणि तो एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि 1050 कोटींचा व्यवसाय केला. याआधी अभिनेत्याचे 7 बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप ठरले होते. पण, किंग खानच्या या सिनेमाने त्याची बुडणारी बोट वाचवली.