‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, पण 10व्या दिवशी ‘जवान’चा रेकॉर्ड मोडणं झालं मुश्किल

‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, पण 10व्या दिवशी ‘जवान’चा रेकॉर्ड मोडणं झालं मुश्किल

Salaar Box Office Collection Day 10: प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा ‘सालार: भाग 1 – सीझफायर’ (Salaar  Movie) हा गेल्या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘सालार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ सोबत कठीण स्पर्धा असूनही ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. ‘सालार’ने रिलीजच्या 10व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला?

‘सालार’ने रिलीजच्या 10व्या दिवशी किती कोटी जमा केले?

प्रभासचा ‘सालार: पार्ट 1 – सीझफायर’ 22 डिसेंबरला पाच भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची मोठ्या पडद्यावर ‘डंकी’सोबत टक्कर झाली होती. मात्र, प्रभासच्या चित्रपटाने शाहरुख खानच्या डंकीला बॉक्स ऑफिसवर पराभूत केले आणि भरपूर गल्ला कमावला. 90.7 कोटी रुपयांसह ओपनिंग केलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 308 कोटी रुपयांचे मजबूत कलेक्शन केले आहे.

आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. ‘सालार’ने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी 9.62 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या शनिवारी सिनेमाच्या कमाईत 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने 12.55 कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 10व्या दिवशी दुसऱ्या रविवारी कमाईचे आकडे समोर आले आहेत.

SACNILC च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या 10व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी 14.50 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, ‘सालार’ची 10 दिवसांची एकूण कमाई आता 344.67 कोटी रुपये झाली आहे.

Box Office: ‘सालार’मुळे बिघडला ‘डंकी’चा खेळ, किंग खानच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हालत खराब

‘सालार’ने जगभरात किती कमाई केली? ‘सालार’ फक्त देशातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून यासोबतच चित्रपटाने जगभरात 500 कोटींचा पल्ला गाठला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 9 दिवसांत जगभरात 504.60 कोटी रुपयांची कमाई केली होती. 10 व्या दिवशी ‘सालार’चे जगभरातील कलेक्शन 520 कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

‘सालार’चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले: ‘सालार: भाग 1 – सीझफायर’ हे ‘केजीएफ’ फेम प्रशांत नील यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले अॅक्शन-पॅक्ड ड्रामा आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याशिवाय श्रुती हासन, जगपती बाबू, माइम गोपी, श्रिया रेड्डी आणि इतर अनेक कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज