Download App

गायक लकी अलीने हिंदू बांधवांची माफी का मागितली…? 

  • Written By: Last Updated:

Lucky Ali : प्रसिद्ध गायक लकी अली यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने दावा केला होता की ‘ब्राह्मण’ हा शब्द ‘अब्राहम’ वरून आला आहे. त्यामुळे लकी अली हे या पोस्टमुळे वादात सापडले आहेत. लकी अलीच्या या पोस्टवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर लकी अली यांना ती पोस्ट स्वतःच डिलीट करावी लागली आणि आता त्याने या प्रकरणावर माफीही मागितली आहे.

लकी अली म्हणाले की, माझा हेतू कोणाला दुखावण्याचा नव्हता. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश आपल्या सर्वांना जवळ आणण्याचा आहे. पण मला जाणवलं की मला जे बोलायचं होतं ते नीट बोललं गेलं नाही. आतापासून काय लिहितो किंवा काय पोस्ट करतो याबद्दल तो अधिक सावध राहणार असल्याचं लकी अली यावेळी म्हणाले.

असली वक्तव्यं आधी बंद करा.. अजितदादा नाना पटोलेंवर भडकले ! – Letsupp

लकी अली यांनी ‘ब्राह्मण’ हे नाव ‘ब्रह्मा’ आणि ‘ब्रह्मा’ हे ‘अब्राहम’ वरून आले आहे. अब्राहम किंवा इब्राहिमपासून आले आहे, अशी पोस्ट फेसबुकवर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ब्राह्मणांना इब्राहिमचे वंशज म्हणून वर्णन करताना लिहिले आहे की, ब्राह्मण हे इब्राहिम अलैहिस्लाम यांचे वंशज आहेत. सर्व राष्ट्रांचे जनक आहेत. मग लोक एकमेकांशी तर्क न करता फक्त वाद आणि भांडण का करतात?

लकी अली यांच्यावर लोक टीका करू लागले आहेत. वाद वाढत असल्याचे पाहुन गायकाने पोस्ट डिलीट केली. आता त्यांनी माफीनामा फेसबुकवर पोस्ट केला आहे. लकी अलीने आपल्या माफीनाम्यात पोस्टवर स्पष्टीकरणही दिले आहे. लकी अलीने माफी मागितली लकी अली. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन मेहमूद यांचा लकी अली हा मुलगा आहे. त्यांनी अनेक उत्तम गाणी गायली आहेत. मात्र, या पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली.

Tags

follow us