पिफ आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नगरच्या मातीतील ‘मदार’

पुणे : राज्य सरकारच्या २१ व्या पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये (पिफ) अहमदनगरच्या ‘मदार’ (Madar) चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अहमदनगरच्या मंगेश बदर ( Mangesh Badar) याने केले आहे. तीन चित्रपटानंतर पुन्हा एकदा अहमदनगरने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) मोहोर उमटवली आहे. दोन फेब्रुवारीला सुरू झालेला महोत्सव नऊ फेब्रुवारीपर्यंत […]

MADAR FILM

MADAR FILM

पुणे : राज्य सरकारच्या २१ व्या पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये (पिफ) अहमदनगरच्या ‘मदार’ (Madar) चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अहमदनगरच्या मंगेश बदर (
Mangesh Badar) याने केले आहे. तीन चित्रपटानंतर पुन्हा एकदा अहमदनगरने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) मोहोर उमटवली आहे. दोन फेब्रुवारीला सुरू झालेला महोत्सव नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, ‘मदार’चे दोन शो होणार आहेत.

महोत्सवात ७२ देशांतील एक हजार ५७४ चित्रपटांनी विविध विभागांमध्ये प्रवेशिका सादर केल्या. त्यातील निवडक १४० चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवातील स्पर्धेत मराठी विभागात महाराष्ट्रातून सात चित्रपट निवडले आहेत. यामध्ये यंदा ‘मदार’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ९३ मिनिटांच्या ‘मदार’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे मंगेश बदर याने केले आहे.

मंगेशने अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमधील कम्युनिकेशन स्टडीजमध्ये चित्रपटाचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने २०२० मध्ये उबळ हा लघुपट केला होता. त्यानेही विविध महोत्सवांमध्ये यश मिळवले होते. मदारमध्ये मिलिंद शिंदे, अमृता आगरवाल, आदिनाथ जाधव, अजिनाथ केवढे, भागाबाई दुधे, अनुजा कांबळे यांनी काम केले आहे. चित्रीकरणाची जबाबदारी आकाश बनकर, अजय भालेराव यांनी पेलली, तर संकलन विशाल सरोदे याने केल आहे. चित्रपटाची निर्मिती एम. एम. फॉरमॅट फिल्मने केली आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, अशा तीन ठिकाणी एकून नऊन पडद्यांवर चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

Exit mobile version