Download App

माधव अभ्यंकर दिसणार किरवंताच्या भूमिकेत; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Madhav Abhyankar म्हणजे महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ यांच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Madhav Abhyankar in Role of Kirvant in Life Line : आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘लाईफलाईन’ (Life Line) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देवाब्राह्मणांच्याआशीर्वादाने चित्रपटातील माधव अभ्यंकर यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

अखेर ठाकरेंनी भाजपला भगदाड पाडलचं; रविवारी सावेंना धक्का देत होणार ‘मेगा इनकमिंग’

आपल्या विचारांवर, मतांवर ठाम असणाऱ्या एका खंबीर किरवंताची ते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ‘लाईफलाईन’मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

Punit Balan यांच्या सामाजिक कार्याचा गौरव; लष्कराकडून प्रशस्तीपत्रक प्रदान

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘लाईफलाईन’ या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या मुख्य भूमिका आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शिन केले आहे.

राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

follow us