Life Line Movie: अशोक मामा आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

Life Line Movie: अशोक मामा आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

Life Line Movie: विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ (Life Line Movie) चित्रपट येत्या 2 ऑगस्ट दिवशी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्राप्त महानायक अशोक सराफ (Ashok Saraf) आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)


अभिनेते अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटात हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट. राजेश शिरवईकर यांची कथा, पटकथा, संवाद आणि गीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. ‘लाईफ लाईन’ हा चित्रपट ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी आहे.

Ashok Saraf: शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम; अशोक मामांनी सांगितला तो किस्सा

‘लाईफ लाईन’ चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, “अतिशय नाजूक विषय असल्यामुळे अतिशय संवेदनशीलरित्या आम्ही तो मांडला आहे. विज्ञान आणि जुन्या परंपरा यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. प्रत्येकाची विचारसरणी बदलणारा ‘लाईफ लाईन’ आहे. कथानक, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज