Madhuri Dixit Birthday: संजय दत्तच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘धकधक गर्ल’? काय आहे नेमकं प्रकरण, वाचा!

Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit ) ओळखले जाते. ‘धकधक गर्ल’ चा आज 57वा वाढदिवस साजरा करत आहे. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर एकेकाळी या अभिनेत्रीने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. (Madhuri Dixit Birthday) ‘धकधक गर्ल’चा जलवा आज देखील कायम आहे, असे म्हणणे काय चुकीचं ठरणार नाही. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T123110.055

Madhuri Dixit Birthday

Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit ) ओळखले जाते. ‘धकधक गर्ल’ चा आज 57वा वाढदिवस साजरा करत आहे. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर एकेकाळी या अभिनेत्रीने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. (Madhuri Dixit Birthday) ‘धकधक गर्ल’चा जलवा आज देखील कायम आहे, असे म्हणणे काय चुकीचं ठरणार नाही.


आज वयाच्या पन्नाशीत देखील अभिनेत्री अतिशय फिट आणि तितकीच सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांअगोदर परदेशातून भारत देशात परतल्यावर ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा मोठ्या आणि छोट्या पडद्यावर सक्रिय झाली आहे. आज देखील ‘धकधक गर्ल’ आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ‘धकधक गर्ल’चे सध्या सिनेमासोबतच छोट्या पडद्यावर अनेक रिऍलिटी शो’मध्ये जज म्हणून काम करत आहे.

परंतु आज आपण अभिनेत्रीच्या वैव्यक्तीक आयुष्यातील एका बहुचर्चित गोष्टीवर प्रकाशझोत टाकणार आहोत. आज अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम नेनेबरोबर आपले आयुष्य जगत आहे. गेल्या 23 वर्षे त्यांच्याबरोबर सुखाचा संसार करत आहे. ‘धकधक गर्ल’ला आज दोन मुलांची आई आहे. आज ‘धकधक गर्ल’चा वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानाने सुरु आहे, तरी एकेकाळी या अभिनेत्रीला प्रेमात फारच कठीण काळाला सामोरे जावे लागले होते.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित एकेकाळी बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थातच अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) म्हणजेच आपल्या सर्व चाहत्यांचे संजू बाबा यांच्या प्रेमात होती. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. ‘धकधक गर्ल’ आणि बाबा ज्यावेळी एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यावेळेस संजय दत्तचं पहिले लग्न झालं होते. इतकंच नव्हे तर त्याला एक मुलगी सुद्धा होती. परंतु दुर्दैवाने संजय दत्तच्या पत्नीचे कॅन्सरमुळे निधन झाले होते.

Exit mobile version