‘बलम पिचकारी’च्या तालावर माधुरी, करिश्माचे ठुमके, चाहते फिदाच…

90 च्या दशकात बॉलिवुड सृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दोन दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. दोघींच्या डान्सचा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांना 90 च्या दशकातले ठुमके आठवले असतीलच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. View this post on Instagram A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor) […]

Madhuri Karishma Dance

Madhuri Karishma Dance

90 च्या दशकात बॉलिवुड सृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दोन दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. दोघींच्या डान्सचा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांना 90 च्या दशकातले ठुमके आठवले असतीलच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

एकेकाळी बॉलिवुड सृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रींनी एकत्र पाहुन चाहते खुश झाले आहेत. माधुरी अन् करिश्माची जोडी पाहुन चाहत्यांना ‘दिल तो पागल है’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल होता. त्यानंतर आता पुन्हा दोघींच्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावलंय.

‘जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचं भलं झालं’; विखे पाटलांची शिंदे-फडणवीसांसमोर टोलेबाजी

अभिनेत्री करिश्मा कपूरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये माधुरी अन् करिश्मा रणबीर कपूर आणि दिपीका पदुकोनच्या ‘बलम पिचकारी’ गाण्यावर थिरकत आहेत. व्हिडिओ शेअर करताना करिश्माने मैत्रीचं दर्शन घडवणाऱ्या एका टॅगलाईनचा वापर केला आहे. “Dance of Envy Friendship” म्हणजेच हा मैत्रीचा डान्स असल्याचं तिने म्हटलं आहे.

Mm

दरम्यान, अनेक वर्षांनंतर दिग्गज अभिनेत्रींचा एकत्र डान्सचा व्हिडिओ पाहुन चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव करण्यात आला आहे. सुपरस्टार , दिल तो पागल है 2 अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

Exit mobile version