Kon Honar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’ च्या (Kon Honar Crorepati ) च्या मंचावर यंदाची दिवाळी खास मराठमोळ्या अंदाजात साजरी होणार आहे. या खास दिवाळी विशेष भागामध्ये या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) खास मराठमोळ्या पारंपरिक नऊवारी साडीत दिसणार आहे. या खास भागासाठी माधुरीनं गुलाबी रंगाच्या सुंदर नऊवारी साडीची निवड केली असून या साडीला असलेली उठावदार सोनेरी किनार तिच्या मोहक सोज्वळ लूकमध्ये अधिकच भर घालते. पारंपरिक नऊवारी साडीतील माधुरीचा हा देखणा अंदाज दिवाळीच्या उत्साहाला साजेसा ठरेल.
या दिवाळी विशेष भागामध्ये माधुरीनं आपल्या या पारंपरिक लूकला साजेसे दागिनेही परिधान केले आहेत. गळ्यातील सुंदर सोन्याचा हार, उठावदार कानातले, पारंपरिक नथ आणि हातातील सोन्याच्या बांगड्यांनी त्यांच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. केसांची नीटनेटकी बांधणी करून त्यात माळलेली गुलाबी फुलं आणि कपाळावरील लाल टिकली यामुळे तिचा हा मराठमोळा साज अधिकच खुलून दिसतो आहे.
माधुरीच्या या खास मराठमोळ्या पारंपरिक लूकसाठी पहात रहा ‘कोण होणार करोडपती’चा हा दिवाळी विशेष भाग शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव वर.
Meta Description : कोण होणार करोडपतीच्या दिवाळी विशेष भागात माधुरी दीक्षित मराठमोळ्या नऊवारी साडीत दिसणार आहे. गुलाबी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि सोज्वळ लूकने माधुरीने जिंकले चाहत्यांचे मन.
