Download App

Madhuri Dixit: धकधक गर्लच्या मराठी सिनेमाची घोषणा; पंचक चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Madhuri Dixit Marathi Movie: कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यात तिचं काय सुरू आहे, (Marathi Movie)हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरी देखील सोशल मीडियावरून (Social media) त्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना कायम देत असते. पण आता माधुरीनं दसऱ्यानिमित्ताने तिच्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. माधुरीच्या आगामी मराठी सिनेमाचं नाव ‘पंचक’ (Panchak )असे असणार आहे.


माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी ‘पंचक’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली आहे. माधुरीने एक खास व्हिडीओ शेअर करत तिच्या ‘पंचक’ या आगामी मराठी सिनेमाची रिलीज डेटबद्दल माहिती दिली आहे. माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स आणि जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित “पंचक” सिनेमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे! एका अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवासाठी सज्ज व्हा!” 5 जानेवारी 2024 दिवशी “पंचक” हा सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती तिने पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

माधुरीनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करत चाहते देखील तिला तिच्या ‘पंचक’ या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी ‘15 ऑगस्ट’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांनी निर्मित केलेला हा पहिला मराठी सिनेमा होता. परंतु आता त्यांच्या पंचक या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत आहे.

Kalam 376 Announced: महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम 376’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

माधुरीने बेटा , खलनायक, हम आप के है कौन, दिल तो पागल है या माधुरीच्या सिनेमानं प्रेक्षकांची खास पसंती मिळाली होती. तसेच गेल्या काही दिवसाखाली माधुरीची ‘द फेम गेम’ ही वेब सीरिज प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले आहे. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी मुख्य भूमिका बजावली होती.

Tags

follow us

वेब स्टोरीज