Download App

Mahadev App Case प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन; आता मुंबईतील प्रोडक्शन हाऊसवर ईडीची धाड!

ED Raid On Production House: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev App Case) अनेक बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे ईडीने (ED Raid) आता या कलाकारांना आपल्या रडारवर घेण्यास सुरुवात केली आहे. कलाकारांनंतर आता मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊस देखील ईडीने छापेमारी केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ईडीने याप्रकरणात मुंबई येथील कुरेशी प्रॉडक्शन (Production House) हाऊसच्या ५ कार्यालयावर छापेमारी केली.


गेल्या काही दिवसांपासून ईडीने ही कारवाई सुरू केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामध्ये अभिनेता रणबीर कपूरला पहिल्यांदा समन्स बजावण्यात आला होता. यानंतर हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर, हिना खान आणि कपिल शर्मा यांना देखील ईडीने समन्स बजावण्यात आला आहे. यानंतर आता ही मोठी धाड टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या अगोदर देखील ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

या कारवाईत तब्बल ४१७ कोटींची संपत्ती जप्त केली होती. गेल्या काही महिन्यांपासून ईडी या प्रकरणी जोरदार कारवाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान या तब्बल ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले आहे. सदरचा बेटिंग अ‍ॅप चालवणाऱ्या सौरभ चंद्राकर याने अनेक कलाकारांना या अ‍ॅपच्या प्रचारासाठी पैसे दिल्याचे समोर येत आहे.

Mahadev app: दिग्गज कलाकार EDच्या रडारवर, आता श्रद्धा कपूरची होणार चौकशी

तसेच या पैशांच्या देवाणघेवाण प्रकरणी ईडी आता चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. याच सौरभ चंद्राकरने गेल्या काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये थाटामाटात लग्न केले होते. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. सध्या या प्रकरणात केवळ ५ कलाकारांना ईडीने समन्स देण्यात आला आहे. तरीदेखील अनेक कलाकार ईडीच्या निशाण्यावर सापडत असल्याचे समोर येत आहे. आता कृष्णा अभिषेक, भारती सिंह, सनी लिओनी, पुलकित सम्राट या कलाकारांची नावे देखील सध्या पुढे आल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us