Mahadev app: दिग्गज कलाकार EDच्या रडारवर, आता श्रद्धा कपूरची होणार चौकशी

Mahadev app: दिग्गज कलाकार EDच्या रडारवर, आता श्रद्धा कपूरची होणार चौकशी

Mahadev betting app case: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने श्रद्धाला समन्स बजावले आहे. (Mahadev betting app case) त्यानंतर या घोटाळ्यामध्ये आणखी १४ बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आले आहेत. (ED Notice) आता या प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी, कपिल शर्मा आणि हिना खान यांचे देखील नाव घेतले जात आहे. या चारही जणांना ईडीने समन्स बजावले आहे. या पैकी श्रद्धा कपूरची आज चौकशी होणार आहे. तर बाकींच्याची चौकशी कधी होणार याची माहिती अद्याप समोर आली नाही.

काल कपिल शर्मा, हुमा कुरेशीला आणि त्याअगोदर रणबीरला ED चे समन्स बजावले आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची ईडीने चौकशी केली होती आणि काही शहरामध्ये छापेमारी करत ४१७ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा अॅपचे प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांचा लग्नसोहळा दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या लग्नाच्या पार्टीला हुमा कुरैशी, हिना खान आणि कपिल शर्माने या दिग्ग्ज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी काही सेलिब्रेटिंनी या ॲपला एंडॉर्स केले होते. यामुळे हे सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर सापडल्याचे बघायला मिळत आहे.

रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार

महादेव गेमिंग अॅप लोकांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. या अॅपच्या जाहिरातीसाठी अभिनेता रणबीर कपूरला काही पैसे कॅशमध्ये देण्यात आले होते. यामुळे सर्वात अगोदर ईडीने त्याला समन्स बजावले आहे. आणि त्याला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु रणबीरने ईडीकडे २ आठवड्यांची मुदत मागितली आहे.

आतापर्यंत रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, हिना खान, हुमा कुरैशी पाठोपाठ आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, भारती सिंह, नेहा कक्कड, एली अवराम, सनी लियोनी, भाग्यश्री, पल्कित सम्राट कीर्ति खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा अभिषेक यांची नावे सध्या समोर आल्याचे बघायला मिळत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube