Download App

विस्कटलेले केस अन् सुकलेला चेहरा; ‘या रावजी’ लावणी फेम शांताबाईंवर भीक मागण्याची वेळ

Shantabai Kopargaonkar : एकेकाळी आपली सदाबहार लावणी नृत्याने महाराष्ट्र गाजविणाऱ्या अन् जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणलं आज त्याच लावणी सम्राज्ञीवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची ही लावणी सम्राज्ञी रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर अस त्यांचे नाव आहे. एकेकाळी त्यांनी आपल्या लावणी नृत्यांनी अनेकांना वेड लावले होते. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला होता.

Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’

अन् सारचं विस्कटून गेलं

या तमाशाचे पुढे शांताबाई स्वतः मालक झाल्या. या माध्यमातून त्यांनी जवळपास पन्नास ते साठ लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. गावोगावच्या यात्रा आणि जत्रांत हा तमाशा प्रसिद्धी पावला. तमाशाची लोकप्रियता वाढल्याने मागणीही वाढली. चांगले उत्पन्न मिळू लागले. पण कालांतराने सारचं विस्कटलं. अशिक्षित असणाऱ्या शांताबाईंची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येते. यानंतर मात्र शांताबाई उद्धवस्त झाल्या. मानसिक आजार जडला. या अवस्थेत त्या भीक मागू लागल्या. जवळचं असं कुणीच नव्हतं. त्यामुळे आज त्या कोपरगावच्या बसस्थानकावर भीक मागत असल्याचे हृदय विदारक दृश्य दिसत आहे. आज शांताबाई बसस्थानकावर दिसतात. पण, विस्कटलेले केस, फाटलेली साडी, सोबत कपड्यांचे बाजके, सुकलेला चेहरा अशा अवस्थेत. इथेच त्या भीक मागून कशातरी उदरनिर्वाह करत आहेत. ओळख जुनी धरून मनी हे लावणी गीत कायमच त्यांच्या तोंडी असते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तसेच त्यांनी एक पोस्टही लिहीली आहे. यामध्ये त्यांनी शांताबाई कोण आहेत याबाबत माहिती दिली आहे. मी स्वतः आणि आमचे पदाधिकारी प्रत्यक्ष त्यांनां भेटून त्यांना योग्य ते औषध उपचार देवून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सर्व मदत मिळवून देणार आहोत.आमच्या खानदेश विभागाचे अध्यक्ष चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर हे वृद्ध कलावंत मानधन समितीवर असतांना जास्तीत जास्त कलावंतांना त्यांनी सरकारी मानधन मिळवून दिले आहे. विशेषत: तमाशा कलावंतांना वाढीव मानधन मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार स्वतः प्रयत्न करत असल्याचे पाटील यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. शांताबाई कोपरगावकर यांची सगळी जबबादारी घेणार असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

शांताबाईंची जबाबदारी राष्ट्रवादी घेणार – पाटील 

नव्वदीच्या शतकातील शांताबाई कोपरगावकर या लोकप्रिय तमाशा फडातील प्रसिद्ध कलावंत शांताबाई लोंढे या मागील १५ वर्षांपासून बेपत्ता होत्या. दोन दिवसांपूर्वी शांताबाई लोंढे या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या कोपरगाव येथील प्रदेश चिटणीस डॉक्टर अशोक गावितरे आणि अरुण खरात यांना अतिशय दुर्दैवी अवस्थेत आढळल्या. या वयोवृद्ध कलाकाराची ही दूरवस्था पाहताच पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन ७० वर्षांच्या शांताबाई लोंढे यांच्या पुढील आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा विषय अवगत करून देत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून लोंढे यांना एक लाखाची मदत करण्याची विनंती केली. त्यावर पवार साहेबांनी सकारात्मक पावले टाकण्याचे आश्वस्त केले, असे पाटील म्हणाले.

Tags

follow us