Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’

Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’

Sanjay Raut on Opposition Meeting : देशातील सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पाटण्यात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाणार आहेत. या बैठकीआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या बैठकीची माहिती देताना त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच 2024 मधील निवडणुका या शेवटच्या निवडणुका असतील असे मत देशाचे आहे, अशी भीती व्यक्ती केली. राऊत म्हणाले, या देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी 2024 साली काय करता येईल. कारण 2024 ची निवडणूक बहुधा शेवटची निवडणूक असेल हे संपूर्ण देशाचं मत आहे.

Sharad Pawar : विरोधीपक्षाच्या बैठकीत देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून पुढची भूमिका ठरवणार

भाजप वगळता सगळे प्रमुख पक्ष आज पाटण्याला जमणार आहेत. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी येत आहेत. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी आले आहेत. अनेक नेते पाटण्याला पोहोचले आहेत. ही बैठक संध्याकाळपर्यंत चालेल. या बैठकीसाठी एकत्र येणं यालाच महत्त्व आहे. त्यातून आजच चमत्कार होईल असं नाही. पण एकत्र येऊन चर्चा करू. काही पाऊले कशी टाकता येतील? काय करता येईल ? एकास एक उमेदवार कसे देता येईल ? याच्यावर नक्की चर्चा होईल, असे राऊत म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले ?

बैठकीला रवाना होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, या बैठकीमध्ये काय होणार हे आज सांगता येणार नाही. मात्र यामध्ये देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. देशातील काही राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे विशेषतः ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही तेथेच होत आहे. त्यामुळे या मागे कोण आहे? हे स्पष्ट आहे. तर देशातील स्थिती योग्य नाही. यासर्व दृष्टीने पुढील भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे. त्यामध्ये इतर राज्यातील प्रश्नांवर देखील चर्चा होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube