Marathi Sahitya Sammelan: ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

Sahitya Sammelan: जळगावच्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे (Dr Ravindra Shobhane) यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची नावे […]

Dr Ravindra Shobhane

Dr Ravindra Shobhane

Sahitya Sammelan: जळगावच्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे (Dr Ravindra Shobhane) यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची नावे जोरदार चर्चेत होती. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, जेष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, जेष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, जेष्ठ समीक्षक यांची नावे चांगलेच चर्चेत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पहिल्यांदा पुण्यात झाले होते.

त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. जळगाव जिल्ह्यात पहिले संमेलन १९३६ मध्ये झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. अमळनेरमध्ये पहिल्या संमेलनामध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये झाले होते. त्यानंतर आता अमळनेर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

कोण आहेत डॉ. रवींद्र शोभणे

डॉ. रवींद्र शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार देण्यात आली आहेत.

Exit mobile version